Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १५ मे, २०२४

*अकलूज येथे" जिजाऊ ब्रिगेड "च्या वतीने ,स्वराज्य रक्षक- "छत्रपती संभाजी महाराज" यांची जयंती साजरी*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448


स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांची 367 वी जयंती जिजाऊ ब्रिगेड सोलापूर पंढरपूर विभागाच्या वतीने अकलूज येथे साजरी करण्यात आली .याचे नियोजन जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा कार्याध्यक्ष शिवमती प्रा. मिनाक्षी अमोल जगदाळे यांनी केले होते. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला व जिजाऊ वंदना घेण्यात आली .



          यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा कार्याध्यक्ष प्रा .मीनाक्षी अमोल जगदाळे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्राची माहिती दिली .यावेळी बोलताना सौ जगदाळे म्हणाल्या एका हातात शस्त्र दुसऱ्या हातात लेखणी घेऊन इतिहास वर्तमान आणि भविष्यकाळात युवकांचे मन मेंदू आणि मनगट बळकट करणारे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज होते .अजिंक्य योद्धा ,रणधुरंदर छावा असे हे संभाजी महाराज होते .संभाजी महाराजांनी बुद्धभूषण ग्रंथ लिहिला. बुद्धांच्या विचाराचा वारसा राजांनी चालवला .संस्कृत मध्ये ग्रंथाचे लेखन कार्य केले आर्या सुक्त श्लोकाच्या माध्यमातून विचार रयतेत रुजवले बुधभूषण ग्रंथात राजांनी 887 श्लोक लिहिले पहिल्या अध्यायात कुळाच्या वारशाचे वर्णन सांगितले रयत समता ममता मातृत्वासाठी दुसरे छत्रपती शोभून दिसले गौतम बुद्ध संभाजी राजान मध्ये अनेक गोष्टीत साम्य दिसले महत्त्वपूर्ण माहितीचे ग्रंथात उदा दाखले सिद्धांत सांगितले.



या कार्यक्रमासाठी प्रा .सौ मीनाक्षी अमोल जगदाळे ,डॉक्टर सौ अर्चना गवळी ,सौ जयश्री देवकर ,सौ अनिता माने ,सौ सुषमा पाटील ,सौ शितल जाधव ,सौ संध्या सावंत ,सौ सुवर्णा शेंडगे ,सौ स्वाती देवकर ,सौ बालिका गोवे ,सौ अर्चना सूर्यवंशी ,सौ रूपाली जगदाळे ,सौ अनिता खटके ,सौ प्रज्ञा जाधव ,सौ,अश्विनी चव्हाण ,सौ साधना पाटील , ,सौ श्रद्धा मोरे कु गौरी सूर्यवंशी ,सौ शारदा चव्हाण हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा