उपसंपादक -नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
अकलूज येथे धर्मरक्षक स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती शंभूराजे यांची ३६७ वी.जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ,संभाजी बिग्रेड जिजाऊ बिग्रेड व अकलुज नगरपरीषद यांचे वतीने जयशंकर उद्यान येथे आ.रणजीतसिंह मोहिते पाटील व अकलुज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील यांच्या शुभहस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय,छत्रपती संभाजी महाराज की जय, जिजाऊ माता की जय च्या घोषणांनी चौक परिसर दणाणून सोडला होता.
याप्रसंगी राहुल जगताप, बाळासाहेब वाईकर,ताई निंबाळकर शुभम काशीद,मोहन लोंढे,बाबा तांबोळी,राजेंद्र काकडे दिंगबर मिसाळ,प्रिया नागने, मिनाक्षी जगदाळे,बबनराव शेंडगे यांच्यासह तमाम शंभूप्रेमी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रास्तविक राजेंद्र मिसाळ यांनी केले तर आभार अजित माने शेंडगे यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा