*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
तुळजापूर - लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील महाविकास आघाडीचे मुंबईतील उमेदवारांच्या विजयासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे कुलस्वामिनी आई भवानी मातेला अभिषेक पूजा व महाआरती करून साकडे घालण्यात आले.
तुळजापूरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी उपजिल्हा प्रमुख शाम पवार, उपतालुका प्रमुख सुनील जाधव,प्रदीप मगर,संजय हाके,देवराज स्वामी यांनी मुंबईतील महाविकास आघाडीचे उमेदवार अरविंद सावंत,अनिल देसाई, राजन विचारे,अमोल कीर्तीकर यांच्या विजयासाठी तुळजाभवानी मातेचरणी अभिषेकपूजा व महाआरती करत मातेचा प्रसाद व कवड्याची माळ मुंबईत प्रत्यक्ष भेट घेऊन सुपूर्द करण्यात आला. तसेच त्यांच्या प्रचारात सहभाग घेतला.
यावेळी प्रचारात शिवसेना नेते भास्कर जाधव, उपनेते नितीन नांदगावकर,चंदूमामा वैद्य यांची सदिच्छा भेट घेत भवानी मातेचे प्रसाद देण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा