*कोल्हापूर ----प्रतिनिधी*
**प्रा.डाॕ.-विश्वनाथ पाटील*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
कोडोली (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर ) / दिनांक १७:. ' वारणेचा वाघ ' अशी ख्याती असलेले येथील श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. येथील दत्त मठीतील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात त्यांना अभिवादन केले. सावे ( ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर ) येथील शिवराय शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डी. डी. पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील होते.
याप्रसंगी कर्यालयीन अधीक्षक एस . के. पाटील, वरिष्ठ लिपिक अनिल इंदुलकर , ग्रंथपाल सूरज इंगळे आणि तानाजी मोहिते आदी उपस्थित होते.
" वारणेचा वाघ" म्हणून ख्याती पावलेले माजी आमदार कै. यशवंत एकनाथ पाटील (दादा) यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना प्रा . डी डी पाटील सोबत दादांच्या स्मृतीला अभिवादन करताना प्रा. डाॕ.विश्वनाथ पाटील कार्यालयीन अधीक्षक एस के पाटील, अनिल इंदुलकर, आणि तानाजी मोहिते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा