Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ३ मे, २०२४

*वडिलांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करून त्यांच्या अस्थी विसर्जन झाडाखाली करून त्यांची आठवण सतत तेवत ठेवली*

 


*अकलुज ---- प्रतिनिधी*

  **केदार----लोहकरे*

*टाइम्स 45 न्युज मराठी

मरावे परि किर्तीरूपी उरावे असे समर्थ रामदास स्वामी यांच्या अभंगातील ओळीची आठवण होते.त्याप्रमाणे माळशिरस तालुक्यातील काळेगांव येथील धर्मराज दुपडे व धनंजय दुपडे यांनी आपल्या शेतात वडीलांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करून वडीलांची अस्ती झाडांच्या बुंध्यात विसर्जन करून झाडाच्या रूपी वडीलांची आठवण सदैव तेवेत ठेवली आहे.



             माळशिरस तालुक्यातील कोळेगांव येथील ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जनार्दन दुपडे यांचे नुकतेच निधन झाले.तिस-या दिवशी रक्षा विसर्जनाच्या दिवशी त्यांची रक्षा नदीत किंवा तिर्थक्षेत्रावर विसर्जीत न करता त्यांच्या मुलांनी वृक्षारोपण करून त्या झाडाखाली वडीलांची अस्ती विसर्जन करून झाडाच्या रूपातून त्याचे अस्तित्व व कार्य त्यांच्या मुलांना व नातवाच्या डोळ्यासमोर सतत आठवण राहील.

            वडीलांनी जिवंतपणी आमच्यावर खूप माय,प्रेम व संस्कार देऊन वाढवले होते.मृत्यू नंतर हि झाडे आम्हाला आयुष्यभर सावली देत राहतील व आमच्या मुलांना सतत आजोबा स्मरणात राहतील असे धर्मराज दुपडे व धनंजय दुपडे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा