इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
-- इंदापुर पंचायत समिती यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता ३ री व ४ थीतील मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी तसेच स्पर्धा परिक्षांची माहिती व्हावी यासाठी प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये डिसलेवस्ती (गिरवी) विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
प्रज्ञाशोध नावाने OMR सीटवर परीक्षा घेतली जाते. यामुळे मुलांना विविध प्रश्नांची माहिती होते. तसेच त्यांना इयत्ता ५ वीतील शिष्यवृत्ती परीक्षेसाठी फायदा होतो. तसेच या परीक्षेमुळे जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढीसाठी व मुलांच्या प्रगती बाबतीत फायदा होतो. एक आदर्श शाळा व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता पुर्ण विकास घडवण्याचे काम जिल्हा परिषद शाळेत घडते. यामुळे जिल्हा परिषद शाळांच्या पट वाढीसाठी व नाव लौकिकासाठी अशा परीक्षा होणे आवश्यक आहेत.
इंदापूर तालुका प्रज्ञाशोध परीक्षा सन २०२३-२४ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिसलेवस्ती (गिरवी) यश संपादन करणारे विद्यार्थी इयत्ता - तिसरी १) संस्कृती नवनाथ देठे (तालुक्यात ९, पिंपरी केंद्रात १), २) सार्थक अशोक बोडके (तालुक्यात १२,
पिंपरी केंद्रात २), ३) श्रुती विजय डिसले (तालुक्यात १३, पिंपरी केंद्रात ३), ४) शौर्य दिलीप बागल (तालुक्यात १६, पिंपरी केंद्रात ४), ५) सार्थक रामचंद्र क्षिरसागर (तालुक्यात २४, पिंपरी केंद्रात ७), ६) वैष्णवी ज्ञानेश्वर देठे (तालुक्यात २८, पिंपरी केंद्रात ९), ७) प्रचीती परमेश्वर डिसले (तालुक्यात ४०, पिंपरी केंद्रात १६), ८) रोहन सौदागर क्षिरसागर (तालुक्यात ४०, पिंपरी केंद्रात १६), ९) श्रेया सतीश क्षिरसागर (तालुक्यात ५४, पिंपरी केंद्रात २४),
त्याचप्रमाणे इयत्ता - चौथीमधिल १) ईश्वरी गणेश बेलपत्रे (तालुक्यात २८, पिंपरी केंद्रात १), २) सिद्धी दत्तात्रय डिसले (तालुक्यात ३२, पिंपरी केंद्रात २), ३) श्रावणी मारुती डिसले (तालुक्यात ३३, पिंपरी केंद्रात ३), ४) समर्थ सचिन म्होपरकर (तालुक्यात ४१, पिंपरी केंद्रात ७) याप्रमाणे विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केल्याबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.
सदरची परीक्षा तत्कालीन गटविकास अधिकारी विजयकुमार परीट व विद्यमान गटविकास अधिकारी सचिन खुडे व गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात यांच्या संकल्पनेतुन तालुक्यात राबविला जात आहे.
शाळेचे मुख्याध्यापक मनोहर जाधव यांनी बोलताना सांगितले, परीक्षेतील मुलांच्या प्रगतीचे कौतुक पालक वर्गातुन होत आहे ही नक्कीच अभिमान व कौतुकाची गोष्ट आहे.
इंदापूर तालुका प्रज्ञाशोध परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या इयत्ता तिसरी व चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक शाळा व्यवस्थापन समिती डिसलेवस्ती -गिरवी यांचे वतीने करण्यात आले. या परीक्षेसाठी मुख्याध्यापक मनोहर जाधव व सहकारी शिक्षिका श्रीमती सुनिता मदने यांनी मार्गदर्शन केले.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा