उपसंपादक---- नुरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती संग्रामनगर ग्रामपंचायत ऑफिसमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.संग्रामनगरचे सरपंच पंकज गाडे यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष विलास क्षीरसागर,उपाध्यक्ष संतोष देव शेटे,पप्पू आंधळकर, ग्रामपंचायत सदस्य भीमाशंकर वैद्य,मदभावी साहेब व माळशिरस तालुका जनसेवा संघटनेचे तालुका अध्यक्ष व लिंगायत समाजाचे माजी खजिनदार पिंटू वैद्य-देशमूख,सचिन कथले, नागेश लिगाडे,ग्रामसेवक सुधाकर मुंगुसकर,अमोल पवार व भैय्या वडतीले ग्रामपंचायत ऑफिस कर्मचारी वर्ग व समस्त विरशैव लिंगायत बांधव व ग्रामपंचायत नागरिक इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा