इंदापूर तालुका..... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
: येथील तीर्थक्षेत्र श्री लक्ष्मी-नृसिंह मंदिरामध्ये श्री नृसिंह जयंती नवरात्र उत्सव सोमवार (ता. १३) ते गुरूवार (ता. २३ मे) दरम्यान होणार आहे. उत्सवा निमित्ताने ११ दिवसांत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहेत. मंगळवार (ता.१४) दंत व डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबीर होणार आहे.
नृसिंह जयंती नवरात्र उत्सवानिमित्त होणारे कार्यक्रम असे, सोमवारी (ता. १३) भरतनाट्यम- शौर्या जोशी, वेदिका जोशी, भावगीत- नादब्रह्म निर्मित भावसरगम, प्रवचन- एकनाथ मेंढेकर, कीर्तन - आनंद काकडे. मंगळवारी (ता. १४) भावगीत शनिवार संगित मंडळ, प्रवचन- पद्मनाभ व्यास, अभंगवाणी - सौ. भक्ती पागे व सहकारी, कीर्तन - रामनाथ बुवा अय्यर, बुधवारी (ता. १५)- शास्त्रीय- संगीत अभय देशपांडे, प्रवचन- रामकृष्ण महाराज वीर, भरतनाट्यम- सुदेष्णा दाणी, कीर्तन- संदिप मांडके यांचे होणार आहे. गुरूवारी (ता. १६) भक्तिगीत- हरीष कुलकर्णी, भावगीत तुषार केळकर आणि सहकारी, प्रवचन- बाळासाहेब महाराज देहुकर, नुपूरनाद डॉ. धनंजय दैठणकर, डॉ. सौ स्वाती दैठणकर व नुपूर दैठणकर, कीर्तन - मंदारबुआ गोखले. शुक्रवारी (ता. १७) सुगम संगीत- डॉ विकास वैद्य, प्रवचन- देवदत्त महाराज वासकर, भारूड - प्रभावती मनोहर डंके, कीर्तन रामचंद्र बुआ भिडे. शनिवारी (ता. १८ मे) कलीकुचीपुडी- श्रद्धा मनोज पाटील, प्रवचन भानुदास महाराज चातुर्मासे, बासरी वादन- नंदकुमार डिंगरे, वसंतपूजा- समस्त ब्रह्मवृंद, कीर्तन लक्ष्मीप्रसाद पटवारी महाराज, रविवारी (ता. १९) सुगम भक्तिसंगीत-रसिका व सानिका संजय कुलकर्णी, प्रवचन-प्रशांत अनंत सुरू, कीर्तन - चारुदत्त बुवा आफळे, भावगीत आशिष केसकर आणि सहकारी, सोमवारी (ता. २०)- भक्तिसंगीत- सौ अनघा अनंत महाजन श्री नरसिंह आख्यान, भक्तिगित-प्रफुल्ल अरगडे, सौ शुभांगी अरगडे, रमेश रावतकर, प्रवचन- सुरेश सुळ महाराज, विशेष कार्यक्रम-सौ ऋतुजा भाले, सौ सुकन्या दंडवते, सौ सुप्रिया दंडवते, कीर्तन- राघवेंद्र नरहर देशपांडे महाराज, मंगळवारी (ता. २१) भक्तिसंगीत- अजित गोसावी, भक्तिगित- अनिरुद्ध जोशी, प्रवचन- मोहनबुवा रामदासी, हार्मोनिअम साथ- गंगाधर देव (पिरंगुट), तबला साथ दिनकर गोसावी (इंदापूर). बुधवारी (ता.२२) छबिना श्रींची पालखी मिरवणूक, गुरुवार (ता.२३) - काल्याचे कीर्तन अंकुश महाराज रणखांबे यांचे होणार आहे.
जे एफ अजमेरा नेत्र रुग्णालय धाराशिव व श्री लक्ष्मी सिंह देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने दंत व डोळे तपासणी शिबिर मंगळवारी (ता.१४) रोजी आयोजित करण्यात आले आहे. श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्ट कडून मोफत चष्मे वाटप होणार असल्याची माहिती मुख्य विश्वस्त, विश्वस्त मंडळी श्री लक्ष्मी देवस्थान ट्रस्ट नीरा नरसिंहपुर यांनी दिली आहे.
फोटो - नीरा नरसिंहपूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह व देवस्थान मंदिर दिसते आहे.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा