उपसंपादक---- नुरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
ऊन,वादळी वारा व अवकाळी पाऊस या अस्मानी संकटाशी झुंज देत आपले जीवन जगत आहे. सध्या शेतातील उभ्या पिकाला पाणी मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर रानातील पिके माना टाकू लागल्यामुळे बळीराजा त्रस्त व दुःखी निराश झाला आहे .
ऐन उन्हाळ्यात नीरा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. शेतातील विहीरतील पाण्याने तळ गाठला आहे.बोअरवेलचे पाणी आटले आहे त्यात नदीवरील बंधा-यातील पाणी गळक्या दारामुळे उन्हाळ्यापुर्वीच वाहून गेले आहे.यावर्षी पावसाळ्यात पाऊस कमी पडला आहे तर पाटबंधारे विभागाने कॅनालला वेळेवर पाणी न सोडल्यामुळे शेतकऱ्यांची हाता तोंडाला आलेली पिके करपून जाऊ लागली आहेत बळीराजा मात्र चारही बाजूने संकटात सापडला आहे.
सध्या कोणत्याच पिकांना योग्य भाव मिळत नाही. कर्ज काढून पिके घ्यायची वेळ शेतकऱ्यावर येत आहे . शेताची मशागत करणे,सतत रासायनिक खतांच्या व बि बियांच्या गगनाला भिडणा-या किंमती,शेतात काम करणा-या मजूरांची वाढती मजुरी,त्यात लोड शेडींगच्या नावाखाली विद्युत पुरवठा खंडित केला जातो.आता तर कॅनाॅलला पाणी येत नसल्यामुळे ऐवढे काबाडकष्ट करून शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येत आहे.
सध्या माळशिरस तालुक्यात नगदी पिके ऊस, केळी,फळांच्या बागा.पाण्याअभावी होलपळून जाऊ लागल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कोणत्याच पिकांना भाव मिळत नाही हे एक संकट शेतकऱ्याच्याया कष्टाला मातीमोल करीत आहे .हरभारे खाल्ले हात कोरडे अशी अवस्था शेतकऱ्याची झाली आहे वाढत्या पिकांकडे पाहून शेतकरी आपल्या गरजा आपली स्वप्ने डोळ्यासमोर घेऊन काबाड कष्ट करतो आणि पिक हातातोंडला आले की आस्मानी संकटाची टांगती तलवार सतत डोक्यावर असल्याने
आ वासून बसलेले नैसर्गिक संकट सारी स्वप्ने गिळणार की काय या धाकधुकीत आपले संघर्षमय जीवन जगत आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा