*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार हा मुस्लिमांचा असल्याचे मनमोहन सिंग यांनी सांगितलं होतं, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी निवडणूक प्रचारादरम्यान केला होता. त्यांच्या या आरोपाला काँग्रेसनेही चोख प्रत्युत्तर दिलं होतं. दरम्यान, मोदींच्या या आरोपावर आता स्वत: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी दोन समुदायांमध्ये कधीही भेदभाव केला नाही, असं ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापूर्वी मनमोहन सिंग यांनी जनतेला उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी पंतप्रधान मोदींच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी पंजाबमधील जनतेला मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवााहनही केले आहे.
मनमोहन सिंग यांनी पत्रात नेमकं म्हटलंय?
"निवडणूक प्रचारादरम्यान होणाऱ्या राजकीय चर्चा आणि आरोप-प्रत्यारोप मी काळजीपूर्वक ऐकत होतो. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी अनेकदा द्वेषपूर्ण भाषणं केली. नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत, ज्यांनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा खाली आणली आहे. त्यांनी पंतप्रधान कार्यालयाचे गांभीर्य कमी केलं आहे. यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानांनी अशा प्रकारे भाषा वापरून एका विशिष्ट समजाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला नाही. कोणीही अशाप्रकारे असंसदीय भाषा वापरली नाही", अशी प्रतिक्रिया मनमोहन सिंग यांनी दिली.
"असे आरोप करायची भाजपाची जुनी सवय"
पुढे ते म्हणाले, "पंतप्रधान मोदींनी माझ्याबाबतही चुकीची विधाने केली. मी माझ्या आयुष्यात कधीही दोन समाजात भेदभाव केला नाही. अशा प्रकारे आरोप करायची भाजपाची जुनी सवय आहे."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा