उपसंपादक .....नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
माळशिरस तालुक्यातील पुर्व भागातील गणेशगांव येथे फक्रृरूद्दीन गुलाब शेख यांच्या शेतात शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम पुर्व प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विविध पिकांवर शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
आज मौजे गणेशगांव येथे फकरुद्दिन गुलाब शेख यांचे शेतावर परिसरातील शेतकरी वर्गांना खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण देण्यात आले.प्रशिक्षणात अकलूजचे कृषी अधिकारी आर.एस.शेळके यांनी खरीप हंगामातील मका,तुर,सोयाबीन तसेच केळी या पिकांचे पीक लागवड तंत्रज्ञानाची सखोल माहिती दिली तसेच या पिकांसाठी बीजप्रक्रिया महत्त्व, सोयाबीन पीक उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक व सविस्तर मार्गदर्शन केले, त्यानंतर कृषी सहाय्यक अण्णासाहेब नलावडे यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच कृषी सहायक गणेशगांव - श्रीमती एस.ए.गोफणे यांनी ऊस पिकावरील हुमनी किड जीवनक्रम,तसेच प्रकाश सापळा महत्त्व,एरंडवन अंबवण व मेटेरायझीम जैविक बुरशीचा वापर इत्यादी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच फळबाग लागवडमध्ये हवामान आधारित पिक पद्धती तंत्रज्ञान बाबत माहिती दिली.कृषी विभागच्या सर्व योजना व दुष्काळ परिस्थितीमध्ये फळबागचे व्यवस्थापन याबाबत माहिती दिली.
यावेळी गणेशगांवचे सरपंच पोपट रुपनवर, विठ्ठल नलवडे ,श्रीमंत शेंडगे प्रगतशील शेतकरी सिताराम शेंडगे,पोलीस पाटील भाईसाब शेख,फकृद्दीन शेख,नजीर शेख, उपसरपंच बाळासाहेब ठोकळे, सामाजिक कार्यकर्त्या नूरजहाँ शेख सह परिसरातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा