*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून त्यांना तातडीने शासकीय मदत मिळण्याबाबत व खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यावा आशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांचे कडे निवेदना द्वारे केली आहे.
आमदार प्रणिती शिंदे यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठक आयोजित करून मागणी केली.
सोलापूर जिल्ह्यामधील मोहोळ तालुक्यामधील पापरी, कोन्हेरी, खंडाळी, मंगळवेढा तालुक्यामधील हुन्नूर, मानेवाडी व पंढरपूर तालुक्यामधील विविध गावांमध्ये तसेच मोहोळ, पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील इतर गावांमध्ये दिनांक 20 मे 2024 नंतर वेळोवेळी झालेल्या वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे केळी, लिंबू, आंबा यासह अनेक फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोबतच अनेक शेतकऱ्यांच्या राहत्या घरावरील पत्रे उडून जाऊन मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच काही ठिकाणी शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून सांभाळलेली दुभती जनावरेही दगावली आहेत. या तालुक्यातील गावांमध्ये, वाड्या वस्त्यांमध्ये विद्युत पोल पडल्यामुळे विद्युत पुरवठा बंद झाला आहे. या ठिकाणी तात्काळ विद्युत पोल उभारून विद्युत पुरवठा सुरु करण्याची आवश्यक आहे. पापरी याठिकाणी वीज पडून सौ. छाया बळीराम कासार या महिलेचा व त्यांच्या घरातील गाईचाही मृत्यू झालेला आहे. दरम्यान मोहोळ, पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यामधील नैसर्गिक आपत्तीग्रस्त गावांची पाहणी केल्यानंतर या सर्व दुर्घटनांची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ पंचनामे करण्यात यावेत. तसेच या गावांमधील केळी व इतर फळबागांच्या झालेल्या नुकसानग्रस्तांना एकरी 1 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच ज्या घरांचे वादळ वाऱ्यांमुळे नुकसान झालेले आहे, त्यांना 100 टक्के नुकसान भरपाई देण्यात यावी. याकरीता सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून त्यांना तातडीने शासकीय मदत मिळण्याकरीता संबंधितांना आदेश व्हावेत. तसेच खंडित झालेला वीजपुरव पूर्ववत करण्यात यावा अशी आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठक आयोजित करून मागणी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा