उपसंपादक .....नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
गणपती अकोले (ता.माढा) येथील श्री गणपती एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या
श्री गणपती फार्मसी काॅलेजमधील प्रथम वर्षात शिकणाऱ्या तीन विद्यार्थींचा आंतरराष्ट्रीय लेख प्रकाशित झाला असून त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
प्रथम वर्षात शिकत असलेले राजेश खुडे,जीवन गावडे,करण भोसले यांनी अथक परिश्रम घेत क्वेस्ट आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये फार्मास्युटिकल इमलशन या विषयावर लेख प्रकाशित केला आहे.हे यश संपादन केलेले आहे.सर्व सामान्य कुटुंबातील हे विद्यार्थी असल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.या विद्यार्थींना प्रा.अक्षय भेंकी सर व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ रुपाली बेंदगुडे यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
हे यश संपादन केल्याबद्दल महाविद्यालयाचे संस्थेचे अध्यक्ष अँड.विजयराव हिरवे,उपाध्यक्ष बाबासाहेब येडगे,संस्थेचे सचिव डॉ.आर. आर.बेंदगुडे प्राचार्या डॉ.रूपाली बेंदगुडे व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा