उपसंपादक---- नुरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
टिपू सुलतान
म्हैसूरचा वाघ होता
टिपू सुलतान एकटा
नुसते राज्य करणे सोडून
धुंडाळल्या नव्या वाटा
वयाच्या अठराव्या वर्षी
इंग्रजाशी तो भिडला
शोर्याच्या लढाया तो
अनेक होत्या लढला
शोधक दूरदृष्टीने जगात
मिसाईल मॅन म्हणून गाजला
अद्वितीयपराक्रमाला टिपूच्या
इंग्रजांनीही होता नावाजला
आई त्यांची फकरूनिस्सा तर
पिता बादशाह हैदरअली शूर
होता टिपूच्या तलवारीलाही
पित्याच्या पराक्रमाचाच नूर
हिरेजडित तलवार टिपूची
मैदानावर विजेसम चमकायची
धडधडणारी तोफ अशी की
शत्रूचा अचूक वेध घ्यायची
राष्ट्भक्तीची धगधगती मशाल
घेऊन सर्व आघाड्यांवर लढलास
दानधर्म करण्यात देवळानाही
भेदभाव कधी न पाळलास
अंधारात ठेवल्या जरी तुझ्या
कर्मठानी पराक्रमाच्या गाथा
शेर ए मैसूर तुझ्या कर्तृत्वाने
भारतीयांचा उंच राहील माथा
सायराबानू चौगुले
माणगाव रायगड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा