*विशेष ----प्रतिनिधी*
*एहसान ---मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9096 837 451
लोकसभा निवडणुकीसाठी कमीतकमी वेळेत जास्तीतजास्त प्रचार सभा घेण्याचा प्रयत्न सगळेच करतात आणि सध्या प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे.
ही घटना महाडमध्ये घडल्याचे सांगण्यात येत आहे. सुषमा अंधारेच्या बसण्यापूर्वीच हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले. या अपघातात पायलट सुखरूप आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 9.30 वाजता सुषमा अंधारे बारामतीच्या दिशेने जाणार होत्या. बारामतीत आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात सहभागी होण्यासाठी त्या महाडहून जाणार होत्या. त्यासाठी त्या हेलिपॅडवर पोहोचल्या. मात्र, सुषमा अंधारे या हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वीच ते क्रॅश झाले. या अपघातात हेलिकॉप्टरचे तुकडे झाले. सुदैवाने हेलिकॉप्टरचा पायलट सुखरुप आहे. स्थानिकांच्या मदतीने पायलटला बाहेर काढण्यात आले.
ही संपूर्ण घटना त्यावेळी सुरू असलेल्या फेस बुक लाईव्ह मध्ये चित्रित झाली आहे. तुम्हीही पाहू शकता पूर्ण व्हिडिओ
हेलिकॉप्टर क्रॅश होण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सध्या सुषमा अंधारे महाडमध्येच आहे. या दुर्घटनेबाबात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मी सुखरूप आहे. माझ्यासह कॅप्टन आणि असिस्टंट आणि माझा लहान भाऊ विशाल गुप्ते आम्ही सगळे सुखरूप आहोत चिंता नसावी",, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा