Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २२ मे, २०२४

*पुणे कल्याणीनगर येथील "हिट अँड रन "प्रकरणी राज्याच्या गृहमंत्र्याचा राजीनामा घेऊन संबंधित आरोपी व पोलिसावर कारवाई करण्याची आझाद समाज पार्टी ची पंतप्रधाना कडे निवेदनाद्वारे मागणी*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448

पुणे कल्याणी नगर "हिट अँड रन" केस प्रकरणांमध्ये महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेन्द्र फडणावीस यांचा राजीनामा घेऊन स्थानिक लोकप्रतिनिधी सुनील टिंगरे आणि संबंधित पोलिसांची देखील चौकशी करून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करणे बाबत आझाद समाज पार्टी लिगल सेल राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद (रावण) आणि महाराष्ट्र चे अध्यक्ष ॲड.तौसिफ शेख यांनी देशाचे पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांना दिलेल्या निवेदना द्वारे मागणी केली असुन या बाबत सविस्तर माहिती अशी कि 

जगामध्ये पुणे शहर शिक्षणाचे माहेरघर म्हणून नावलौकिक आहे परंतु येथील शासन-प्रशासन यांच्या भ्रष्ट आणि भोंगळ कारभारामुळे पुणे शहराची ओळख ही "नशा हब" अशी होत आहे. पुणे शहरात महाराष्ट्रातून नव्हे, देशातूनच नव्हे तर जगभरातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. परंतु आजची परिस्थिती नशा युक्त पुणे असे झाले आहे. त्यामुळे आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून नशा मुक्त अभियानांतर्गत आंतरराष्ट्रीय सिंबोसिस महाविद्यालय च्या समोर खुलेआम पणे विक्री होत असलेल्या अमली पदार्थाचा पर्दा फाश करून विमानतळ पोलीस स्टेशन येथे गु.र. नं ३३/२०२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला, परंतु त्यावेळेस पोलीस चाल ढकल केल्याचे आम्हाला निदर्शनास आले. त्यामुळे आम्ही मा. उच्च न्यायालय मुंबई येथे दाद मागितली.


अशी परिस्थिती असताना पुणे हे शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये दिवस रात्र दारू, गांजा, चरस, हुक्का, तसेच इतर अमली पदार्थाची विक्री होत असताना दिसत आहे. तसेच मोठमोठ्या हॉटेल-पब मध्ये अमली पदार्थाच्या नशेत नंगानाच सुरू असल्याचे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे व त्यामध्ये येणाऱ्यांचे वय देखील न तपासता कायद्याचे नियम धाब्यावर ठेऊन सर्रासपणे मनमानेल तसे रात्रभर चालू ठेवत आहेत. या सर्व गोष्टीमुळे पुण्यामध्ये कायद्याचे राज्य संपल्याचे दिसून येत आहे.


यामुळेच १९ मे २०२४ रोजी महागड्या पोर्शे कार ने भरधाव वेगाने चिरडून दोन निष्पाप जिवांचा बळी घेतल्याची घटना घडली यापेक्षा दुर्देवी म्हणजे आरोपीला काही तासातच जामीन मिळाला कारण आरोपी हा एका श्रीमंत बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा होता. आरोपीला वाचविण्यासाठी स्थानिक लोक प्रतिनिधी आमदार सुनील टिंगरे, पोलीस प्रशासन कामाला लागले तसेच आरोपीला पोलीस स्टेशन च्या आवारामध्ये खाण्यासाठी पिझ्झा बर्गर देण्यात आले व आरोपीवर जाणीवपूर्वक भा.द.वि. कलम ३०४ हे अजामीनपात्र कलम न लावता फक्त जामीनपात्र कलम ३०४ अ लावण्यात आले.


त्यामुळे पुणे हे सांस्कृतिक राजधानीचे जतन करून असांस्कृतिक-बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यावर या भ्रष्ट शासन-प्रशासन यांचे धाक राहिलेले नाही म्हणून ताबडतोब गृहमंत्री यांचा राजीनामा घेऊन उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या मार्फत एस आय टी स्थापन करून लोक प्रतिनिधी आमदार सुनील टिंगरे, बांधकाम व्यावसायिक अग्रवाल व आरोपी व पोलीस प्रशासनाचे फोन रेकॉर्डिंग, सी डी आर, बँक स्टेटमेंट चे निपक्ष तपासणी करावी कारण सदरील प्रकरणात खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक स्वरूपाची अफरा तफर झाल्याची चर्चा आहे- या सर्व गोष्टीची आपण देशाचे प्रधान म्हणून त्वरीत दखल घेऊन पीडितेला व पुणे शहराला न्याय द्यावा हि विनंती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा