Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २३ मे, २०२४

*अकलुज येथील "बागवान सहारा फाउंडेशन " च्या सामुदायिक विवाहात पाच जोडप्यांचा विवाह संपन्न*

 


*विशेष-प्रतिनिधी---एहसान मुलाणी*

*टाइम्स 45 न्युज मराठी

अकलूज येथे बागवान निसर्गरम्य असलेल्या आनंदी गणेश मंदिराजवळील आनंदी गणेश मंगल कार्यालय-- आनंद नगर ,अकलूज ,ता. माळशिरस जि. सोलापूर येथील बागवान सहारा फाउंडेशन अकलूज (रजि.नं.R.G.No.S L P/ 12296/ 1860/24.) च्या वतीने सामुदायिक विवाह संपन्न झाला आणि या सामुदायिक विवाहात एकूण 5 जोडप्यांचा विवाह संपन्न होऊन विवाह बंधनात बांधले गेले सामुदायिक विवाहाचे आयोजन बागवान सहारा फाउंडेशन चे अध्यक्ष मुन्नाभाई चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते 




या विवाह सोहळ्यास वधू-वराकडून प्रत्येकी पाच हजार रुपये देणगी घेण्यात आली होती ज्यामध्ये मंगल कार्यालय, स्वादिष्ट जेवण ,नवरदेवाला फेटा, पुष्पहार इत्यादी वस्तू देण्यात आल्या होत्या याप्रसंगी वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन- जयसिंह मोहिते पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन - मदनसिंह मोहिते पाटील ,इशिता (आक्का ) मोहिते पाटील ,अकलूज ग्रामपंचायतचे माजी सरपंच- किशोरसिंह माने पाटील ,माजी उपसरपंच- पांडुरंग भाऊ देशमुख ,आदि मान्यवर उपस्थित होते या सामुदायिक विवाह आलेल्या सर्व पै पाहुणे मित्रमंडळींच्या जेवणाची व्यवस्था चोख करण्यात आली होती हा सामुदायिक विवाह चा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी अकलूज शहर बागवान जमात व बागवान सहारा फाउंडेशनच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा