Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २२ मे, २०२४

*अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत ---युवा सेनेची मागणी*

 


*विशेष-प्रतिनिधी---एहसान मुलाणी*

*टाइम्स 45 न्युज मराठी

शिवसेना युवा सेना सचिव वरूण सरदेसाई युवा सेना विभागीय सचिव अक्षय ढोबळे युवासेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख उत्तम आयवळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांचे आदेशाने युवा सेना तालुका प्रमुख सुभाष काकडे यांनी माळशिरस चे तहसीलदार सुरेश जी शेजूल साहेब यांना नुकसानीचे पंचनामे त्वरित करावेत अशा विषयीचे निवेदन देण्यात आले .


 माळशिरस तालुक्यात सलग तीन चार दिवस झाले वादळी वाऱ्या सह पाऊस पडत आहे .वाऱ्या मुळे माळशिरस तालुक्यातील पूर्व भागातील संगम बाभुळगांव लवंग वाघोली वाफेगांव गणेशगांव अशा अनेक भागा मध्ये केळी आंबा पेरू आदी फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे बाभुळगांव येथील काही घरांचे पत्रे उडाले आहेत.माळशिरस तालुक्यातील पूर्व आणी पश्चिम भागातील तलाठी पिकांचे पंचनामे करण्यास मनाई करत आहेत त्यामुळे आपण माळशिरस तालुक्यातील तलाठी यांना शेतकऱ्यांच्या बंदावरती जाऊन तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना द्याव्यात अन्यथा युवा सेनेच्या वतीने तहसील कार्यालय समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा सेनेच्या वतीने देण्यात आला यावेळी युवा सेना विधान सभा तालुका प्रमुख मयूर सरगर ,युवा सेना उपतालुका दुर्वा आडके, तुषार राऊत, महेश लोखंडे, अजय नाईकनवरे ,अर्जुन लोखंडे, इ युवा सैनिक उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा