उपसंपादक---- नुरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
आपलं ठरलंय म्हणत कार्यकर्त्यांनी जागृत राहून कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक गमिनी काव्याने
जिंकायचीच आहे.असे जयसिंह मोहिते पाटील यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.ते पुढे म्हणाले मतदान सुरू असताना कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका.अकलूज पॅटर्न प्रमाणे प्रत्येकाने आपल्याला नेमून दिलेले काम करायचे आहे
माढा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ कर्मवीर बाबासाहेब माने पाटील वाड्यावर आयोजित केलेल्या भव्य सभेत अकलूज परिसरातील विविध सामाजिक धार्मिक व संघटना युवक संघटना विविध मंडळे यांनी आपला जाहीर पाठिंबा धैर्यशील मोहिते पाटील यांना देऊन त्यांना प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.
अकलूज येथे आयोजित केलेल्या या सभेमध्ये प्रथमच मोहिते पाटील,माने पाटील व देशमुख यांच्या राजकारणात चौथी पिढी उपस्थित राहून सभा सभा गाजवली व सक्रिय प्रचारात सहभाग घेऊन प्रचाराची धुरा हाती घेतली जयसिंह मोहिते पाटील यांचे नातू संग्रामसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव सयाजीराजे मोहिते पाटील किशोरसिंह माने पाटील यांचे चिरंजीव क्रांतीसिंह माने पाटील पांडुरंग भाऊ देशमुख यांचे चिरंजीव सिद्धराज (मालक) देशमुख याच बरोबर अनेक युवाकांनी या सभेत सहभाग घेतला
यावेळी संग्रामसिंह मोहिते, पाटील,शिवसेनेचे नामदेवराव वाघमारे,पांडुरंगराव देशमुख, धनंजयराव देशमुख,सतीश अण्णा माने पाटील,दत्ता पवार, ॲड.हसीना शेख,फतीमा पाटावाला शिवसेना अध्यक्ष संतोष राऊत माजी सरपंच विठ्ठल गायकवाड,महादेव अंधारे,भैय्या वाडेकर,सतीश व्होरा,कल्पेश पांढरे,ॲड.सोमनाथ वाघमारे नागेश नष्टे,रंजीत भोसले, अविनाश काले,महादेव बंडगर आदी नेत्यांनी आपले विचार व्यक्त करत धैर्यशील मोहिते पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले
*चौकट*
*यावेळी वीरशैव लिंगायत समाज जैन समाज,बुरुड समाज,मौलाना आझाद विचार मंच,लाड सुवर्णकार संघटना,गवळी समाज,अखिल भारतीय माळी समाज,महाराष्ट्र राज्य माळशिरस तालुका राष्ट्रीय साखर कामगार युनियन,घडशी समाज बौद्ध समाज,लोहार समाज,हिंदू खाटीक समाज व विविध धार्मिक व युवक संघटना आणि यावेळी पाठिंबाची पत्रे जयसिंह मोहिते पाटील यांना दिले.*
*यावेळी प्रथमच सयाजी राजे मोहिते पाटील यांनी प्रचाराला संबोधित करताना युवकांचे प्रश्न आणि ही निवडणूक युवकांनी हातात घेतले ते जाहीर करत चार तारखेला तुतारी चा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे व गुलाल आपलाच आहे.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा