Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २२ मे, २०२४

नरसिंह जयंतीनिमित्त नरसिंहपूरला निकाली कुस्त्याचे जंगी मैदानाचे आयोजन, नामांकित मल्लांची उपस्थिती लाभणार

 


इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147


-- येथे परंपरे प्रमाणे होणाऱ्या नरसिंह जयंती उत्सवा निमित्त निकाली कुस्त्याचे जंगी मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरवार २३ रोजी दुपारी २ वाजता कुस्ती आखाड्याचे पूजन ग्रामस्थांच्या हस्ते करून कुस्त्याला प्रारंभ होणार आहे.

    सरपंच प्रतिनिधी नितीन सरवदे बोलताना म्हणाले की, लक्ष्मी नरसिंहाच्या उत्सवासाठी आलेल्या भाविकांना व कुस्ती शौकिनांना कोणत्याही अडचणी येऊ दिल्या जाणार नाहीत. नामांकित पैलवान व प्रमुख मंडळींचा यात्रा कमिटीच्या वतीने आखाड्यात सन्मान करण्यात येणार आहे. 

     मैदानात ५० (पन्नास) रुपये पासून ते एक लाख रुपये पर्यंतच्या इनामाच्या निकाली कुस्त्या खेळवण्यात येणार आहेत. तसेच आखाड्यात महाराष्ट्र चॅम्पियन कुस्ती सम्राट पैंलवान रावसाहेब (आपा) मगर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. नरसिंहपूरचे वस्ताद सचिन कदम व माजी सरपंच आण्णासाहेब काळे यांनी कुस्त्यांचे आयोजन केले आहे.



   नीरा नरसिंहपुर सरपंच अर्चना सरवदे, सरपंच प्रतिनिधी नितीन सरवदे, उपसरपंच गुरुदत्त गोसावी, यात्रा कमिटी अध्यक्ष विठ्ठल धोत्रे, उपाध्यक्ष उमेश घोडके, तंटामुक्ती अध्यक्ष दशरथ राऊत, ग्रामपंचायत सदस्य व नरसिंहपूर ग्रामस्थ यांच्या पुढाकाराने निकाली कुस्त्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा, उस्मानाबाद आदि जिल्ह्यातून नामांकित कुस्तीमल्ल पैलवानांची हजारोच्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे नरसिंहपुर येथील यात्रा कमिटीच्या वतीने सांगण्यात आले. निकाली कुस्त्याच्या निवेदनासाठी पैंलवान युवराज केचे उपस्थित राहणार आहेत.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा