इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
-- मौजे बोराटवाडी येथे खरीप हंगाम २०२४ पूर्वनियोजन आयोजन करण्यात आले. त्यावेळी मंडल कृषी अधिकारी जी. पी. सुर्यवंशी, कृषी पर्यवेक्षक एन. डी. बोराटे, कृषि सहाय्यक अक्षय कुंभार, कृषि सहाय्यक बोराटवाडी श्रीमती ए. ए. अडसूळ उपस्थित होते,
सूर्यवंशी साहेब यांनी बीज उगवण क्षमता चाचणी, बीजप्रक्रिया, ऊस पाचट व्यवस्थापन यांचे मार्गदर्शन केले. तसेच सध्या पाऊस सुरू झाल्याने वर्षभर न दिसणारे हुमनी भुंगेरे प्रकाश सापळ्याच्या साहाय्याने कसे नियंत्रित करावे याचे प्रात्यक्षिक दाखवले. शेतकऱ्यांनी खर्च कमी करून एकात्मिक पीक व्यवस्थापन करावे व आपल्या उत्पन्नात वाढ करावी असे आवाहन केले.
कृषि पर्यवेक्षक बोराटे साहेब यांनी डाळिंब फळपीक व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन केले. कुंभार साहेब कृषि सहाय्यक बावडा व श्रीमती जगताप मॅडम कृषी सहाय्यक पिठेवाडी यांनी mahadbt वरील कृषी योजना यावर मार्गदर्शन केले. तर किसन मदने सहाय्यक प्राध्यापक कृषी महाविद्यालय पानिव यांनी सेंद्रिय शेतीचा वापर आपल्या पुढील पिढीला निरोगी शेती हस्तांतरित करण्यासाठी किती गरजेचे आहे त्याबद्दल विश्लेषण केले. देशी गाय पाळणे, गांडूळ खत, जीवामृत, दशपर्णी अर्क यांचा वापर करून कमीत कमी रासायनिक खतांची विषमुक्त शेती कशी राहील याची आपण दक्षता घेतली पाहीजे असे नमूद केले. मका पीक व्यवस्थानाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी श्रीराम शेतकरी बचत गटाचे प्रगतशील शेतकरी तसेच महिला शेतकरी उपस्थित राहिले.
फोटो - बोराटवाडी येथे खरीप हंगाम २०२४ पूर्वनियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा