Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २२ मे, २०२४

*अकलूज( शिवापूर पेठ) येथे नृसिंह जयंती मोठ्या उत्साहात साजरी*

 


*अकलुज - प्रतिनिधी*

*केदार लोहकरे*

*टाइम्स 45 न्युज मराठी

अकलूज येथील शिवापूर पेठेमधील श्री नृसिंह गणेशोत्सव मंडळच्या वतीने श्री नृसिंह जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

            कासार गल्ली येथील कै. मोतीलाल रामचंद्र वेळापुरे यांच्या परिवाराने स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये श्री नृसिंह गणेश मंडळाची स्थापना केली.याच मंदिरामध्ये दरवर्षी श्री नृसिंह जयंती साजरी करण्यात येते.मागील आठ वर्षापासून वेळापुरे परिवाराने जयंती सोहळा मोठ्या प्रमाणावरती साजरे करण्याचे सुरू केले.नृसिंह जयंतीनिमित्त मंदिरात श्री नृसिंहचा अभिषेक व पूजा करण्यात आली.तर तुकाराम भजनी मंडळांने धार्मिक वातावरण निर्माण केले. सायंकाळी सहा वाजता श्री नृसिंह जन्म सोहळा व महाआरती झाली.त्यानंतर सुमारे एक हजार भाविकांना वेळापूरे परिवाराच्या वतीने महाप्रसादाचा लाभ देण्यात आला.शिवापुर पेठेतील मुख्य बाजारपेठेत असणारे हे मंदिर भाविकांचे व व्यापारी वर्गांचे श्रद्धास्थान आहे.मोहन वेळापूरे,विजय वेळापुरे, राजकुमार वेळापुरे,प्रमोद वेळापूरे,विनोद वेळापुरे,मयूर वेळापुरे,शैलेश वेळापुरे,अमर वेळापुरे,दत्तात्रय वेळापुरे,वैभव वेळापुरे,योगेश वेळापुरे,मनोज वेळापुरे,प्रकाश वेळापूरे व समस्त वेळापुरे परिवारांनी जयंती सोहळा धार्मिक पद्धतीने साजरा केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा