*अकलुज ---प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी
पैशाच्या व संपत्तीच्या मागे धावणाऱ्या प्रदूषित सामाजिक व्यवस्थेतील काळोख दूर करण्यासाठी शिक्षकांनी निरपेक्षपणे कार्य करण्याची आवश्यकता आहे"असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.विश्वनाथ पाटील यांनी केले.कोडोली (ता.पन्हाळा) येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यायातील सन २००९ च्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी माजी विद्यार्थी व यशवंत इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य मंदार पसरनीकर, महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक एस.के.पाटील व्यासपीठावर होते.माजी विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने अचानक या मेळाव्याचे आयोजन करुन महाविद्यालयाच्या प्रशासनास जणू आश्चर्याचा धक्का दिला ! "नवीन प्रवेशासाठी एव्हढी अचानक गर्दी झाली आहे काय ? "अशा प्राचार्यांच्या प्रश्नार्थक विधानाने उपस्थितांमध्ये एकच हंशा पिकला !
याप्रसंगी मंदार पसरणीकर,कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक बँकेचे संचालक प्रकाश कोकाटे,सदिच्छा सणगर,बचत गट सामाजिक कार्यकर्त्या माधुरी पाटील-मोरे, किशोरी पाटील,विकास गायकवाड आदी माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थीदशेत अनुभवलेल्या अनुभवांना उजाळा देत महाविद्यायाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपक शेणेकर यांनी केले व सूत्रसंचालन केले तर संदीप भोसले यांनी आभार मानले.सेवक तानाजी गणपती मोहिते यांनी छायाचित्रणाची व चहापानाची बाजू सांभाळली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा