*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
सोलापूर :--- नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथील माळढोक पक्षी अभयारण्यात वन्यजीव प्राणी व पक्षी गणनेत यंदा दुर्मिळ माळढोक (मादी) पक्ष्याने गंगेवाडी शिवारात दर्शन दिल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे निसर्गप्रेमी, पक्षीमित्र व पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
बुद्ध पौर्णिमानिमित्त सन २०२४-२५ ची वन्यजीव प्राणी गणना करण्यात आली. बुधवारी (दि.२२) ते गुरूवारी (दि.२३) पर्यंत नान्नज माळढोक पक्षी अभयारण्य अंतर्गत वडाळा, मार्डी, कारंबा, गंगेवाडी, हिरज, नरोटेवाडी व इतर गावातील २५ पाणवट्यावर वन्यजीव प्राणी गणना पार पडली.
प्राणी गणनेत काळवीट, खोकडे, रानडुक्कर, रानमांजर, नीलगाय, कोल्हा प्राण्याची संख्या वाढली असून लांडगा, ससा, मुंगूस, सायाळ, घोरपड यांची संख्या घटली आहे. तर यंदा प्रथमच कुदळ्या २१ पक्षी आढळले असून ६१ मोर पक्षी दिसले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा