*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
लेखक इंद्रजित पाटील लिखित ' शेलक्या बारा ' या कथासंग्रहास आज दुसरा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला. तितिक्षा इंटरनॅशनलच्या संस्थापक,अध्यक्षा प्रिया प्रमाेद दामले,पुणे यांनी अधिकृतरित्या हा पुरस्कार जाहीर केला.तितिक्षा ग्रंथ पुरस्कार -२०२४ साठी ' शेलक्या बारा ' या कथासंग्रहाची सर्वाेत्कृष्ट कथासंग्रह म्हणून निवड झाली आहे.विशेष म्हणजे या कथासंग्रहाचे मुखपृष्ठ हरहुन्नरी साहित्यिक कै.डाॅ.विशाल इंगाेले,लाेणार,बुलढाणा यांनी बनवले असून त्यांच्या आयुष्यातील हे शेवटचे चित्र ठरले.
ग्रामीण भागातून आपल्या प्रतिभेची चुणूक दाखविणाऱ्या लेखक इंद्रजित पाटील यांचे सर्वत्र काैतुक हाेत आहे. याआधीही त्यांना बरेच राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.
मा.श्री.माधवरावजी कुतवळ,जनसेवक अमाेल (भैया) कुतवळ, तुळजापूर,मा.श्री.पंडितराव लाेहाेकरे,भागवत उकिरंडे,चंद्रकांत पाटील,रावसाहेब पाटील,संजय भड,अमाेल देशमुख,राकेश गरड यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा