Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ९ मे, २०२४

*साडे तीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त म्हणजे ---"अक्षय तृतीया"*

 


*कवयिञी--सुवर्णा घोरपडे

अक्षय तृतीया

दिन असे खास

भुकेलिया देऊ

मुखी चार घास ॥१ ॥


पूर्वज स्मरण

तीळ ते तर्पण

जल कुंभदान

करूया अर्पण ॥ २ ॥


वसंत माधव 

पूजा सजे छान

गरजूंना करू

सत्पात्री ते दान ॥३ ॥


वैशाख मासात 

चैत्रागौर खास 

बळीराजा लागे

पावसाची आस ॥ ४ ॥


पुरणाची पोळी

नैवेद्याला आज

पंचपक्वानाला

आमरस साज ॥ ५ ॥


अखंड अक्षय

लक्ष्मीरूपी धन

सुख समृद्धीने

आनंदिते मन ॥ ६ ॥


        *कवयित्री*

     *सुवर्णा घोरपडे*

    संग्रामनगर अकलूज 

ता.माळशिरस जि.सोलापूर



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा