Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ९ मे, २०२४

*आरोग्यासाठी आहे बहुगुणी फळांचा राजा --"आंबा" पहा त्याचे अनेक फायदे*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448

फळांचा राजा आंबा म्हणजे अनेकांच्या आवडीचा विषय. गोड, रसाळ असणारं हे फळ असंख्य पोषक तत्वांचा खजिना आहे. हेच कारण आहे की आंबाप्रेमी मोठ्या चवीने हे फळ खातात. जगभरात असलेली वाढती मागणी आणि लोकप्रियता पाहून दरवर्षी २२ जुलै हा दिवस 'नॅशनल मॅंगो डे' म्हणून साजरा केला जातो. 



क्वचितच असं कोणी सापडेल ज्यांना आंबा खाणं आवडत नाही. आंबा हे फळ भारतीय इतिहास आणि संस्कृतीचा महत्वाचा घटक असून सर्वांच्या आवडीच्या फळांपैकी एक आहे. तसेच फळांचा राजा म्हणून आंब्याची जगभर ख्याती आहे. याशिवाय आंब्याचे वेगवेगळे गुणधर्म देखील आहेत. व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम तसेच फायबरच्या गुणांनी परिपूर्ण असणारा आंबा शरीरासाठी प्रचंड फायदेशीर आहे.


डोळ्यांच्या आरोग्यास फायदेशीर ठरतो-


आंबा हा बीटा-कॅरोटिनचा उत्तम स्त्रोत मानला जातो. ज्याच्या सेवनाने शरीरातील व्हिटॅमिन ए ची कमतरता दूर होण्यास मदत होते. व्हिटॅमिन ए चांगल्या दृष्टीसाठी आवश्यक ठरतं. त्यामुळे वयासंबंधित मेकुलर डिजनरेशनपासून डोळ्यांचे संरक्षण होते. 


रोगप्रतिकारशक्ती वाढते- 


शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आंबा खाणं केव्हाही फायदेशीर ठरतं. आंबा म्हणजे व्हिटॅमिन सी चा एक परिपूर्ण स्त्रोत आहे. शिवाय त्यामध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडंटचे गुणधर्म देखील आढळतात. ज्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते. 


कर्करोगाचा धोका कमी होतो- 


आंब्यामध्ये मॅगिफेरिन नामक घटक आढळतो. मॅगिफेरिन एक अ‍ॅंटी-ऑक्सिडंट घटक आहे. ज्यामध्ये कॅन्सरविरोधी गुणधर्म असतात. तसेच शरीरात कॅन्सरसारख्या घातक पेशींची वाढ रोखण्यास ते मदत करते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा