*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
मौजे सिंदफळ ता.तुळजापूरस सर्वे नंबर 187 पैकी क्षेत्र 07 हेक्टर 27 आर चे क्षेत्राबाबत श्रीमती शाशिकला दत्ताञय दहिहांडे, रा. भवानी रोड, तुळजापूर यांनी रहिवाशी प्रयोजनासाठी सुधारित रेखांकन मंजूर करणे बाबत दिलेला अर्जाबाबत सदरच्या रेखांकनास अंतिम मान्यता नसताना प्लॉट विक्री केले बाबत तसेच स्टॅम्प
व्हेंडर बालाजी ढोबळे यांचा परवाना रद्द करणे बाबत. 7/06/2024 दिनांक 20/06/2024 रोजी दिलेले तक्रारी अर्ज
अर्जदार :- अमोल शिवाजी जाधव, रा. मंकावती गल्ली, तुळजापूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव.
वरील विषयी संदर्भ क । व 2 नुसार वर नमूद विषया संदर्भात तक्रारी अर्ज दिलेले आहेत. तरी सदर तक्रारीच्या अनुषंगाने आपल्या कार्यालयाकडून कोणत्या प्रकारची कारवाई केली, याचा खुलासा अथवा पञव्यवहार आपल्या कार्यालया मार्फत माझ्याशी केलेला नाही.
तसेच वर विषया संदर्भात कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे सदर गैरअर्जदार शशिकला दत्तात्रय दहिहांडे या व स्टॅम्प व्हेंडर बालाजी डांबळे हे बेकायदेशीर रित्या सब्हें नं. 187 मधील क्षेत्र 07 हे 27 आर मधील प्लॉट हे नगर रचनाकार कार्यालय, धाराशिव यांची अंतिम मान्यता नसताना देखील स्टॅम्प व्हेंडर बालाजी ढोबळे हे त्यांना शासना मार्फत प्रदान करण्यात आलेल्या परवान्याचा गैरवापर करुन स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी खोटा मजकूर तयार करून संबंधीत दुय्यम निबंधक कार्यालय, तुळजापूर येथे संदिग्धता निर्माण करुन व खोटा मजकूर तयार करुन शशिकला दत्तात्रय दहिहांडे या व स्टॅम्प व्हेंडर बालानी ढोबळे हे सर्व्हे नं. 187 मधील क्षेत्र 07 हे 27 आर मधील प्लॉट बेकायदेशीर रित्या विक्री करत आहेत
तसेच सालसन 2024 मध्ये सदर सर्व्हे नं. 187 मधील क्षेत्र 07 हे 27 आर या क्षेत्रामधील बेकायदेशीर रित्त्या शशिकला दत्तात्रय दहिहांडे यांनी काही प्लॉट विक्री केलेले आहेत, त्याचा तपशील पुढील प्रमाणे:-
1) दि. 12/04/2024 रोजी दस्त क्र. 2041/2024 अन्वये 1) शाहु विश्वनाथ लोदगे, 2) पुजा मनोज मुळे व 3) मनीषा संभाजी पवार यांना भूखंड क्रं. 177 एकूण क्षेत्रफळ 333.29 चौ.मी. ही खुली जागा विक्री केलेली आहे.
1) दि. 12/04/2024 रोजी दस्त क्रं. 2042/2024 अन्वये 1) सचिन संजय मुळे व 2) शाहू विश्वनाथ लोदगे यांना भूखंड क्रं. 178 एकूण क्षेत्रफळ 256.66 चौ. मी. ही खुली जागा विक्री केलेली आहे.
दि.12/42024रोजी दस्तक्रमांंक 2043/2024 आन्वयेसंभाजी धनराज पवार व नारायण धनराज पवार यांना भूखांड क्रमांक 172 एकूण क्षेञफळ 354.22 चौरसमीटर ही खुली जागा विक्री केलेली आहे
वर नमुद केल्या प्रमाणे शशिकला दत्ताञय दहिहांडे यांनी सदर जमीन सर्वे नंबर 187 मधील क्षेञ 7 हेक्टर 27 आर या क्षेत्रातील काही प्लॉट बेकायदेशीर रित्या विक्री केलेले असुन जे की शर्थी पोटी भंग झालेला आहे तरी सदर प्रकरणी शशिकला दत्ताञय दहिहांडे यांनी नगर रचनाकार धाराशिव यांनी दिलेल्या अटी ल शर्थीचे तसेचशासनाने घातलेल्या शर्थीचे उल्लंघन केले असल्याने नगररचनाकार अधिकाऱ्यांनी सदर प्रकरणात सखोल चौकशी करून संबंधितावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी तसेच स्टॅम्प व्हेंडर बालाजी ढोबळे यांनी शासनाने दिलेल्या परवान्याचा गैरवापर केल्यामुळे सदरचा परवाना रद्द करण्यात यावा जेणे करुन यापुढे कोणत्याही सामान्य माणसाची फसवणूकहोणार नाही व वरनमुद प्रकारचा वादविवाद निर्माण होणार नाही याबाबत संदर्भीय तक्रारी अर्ज देऊनही कारवाई करण्यात आली नसल्याने तक्रारदार हे दिनांक 1/7/2024 रोजी पासुन तुळजापूर तहसिल कार्यालया समोर आमरण उपोषण रणार असुन जो पर्यंत संबंधीता वर कायदेशीर कार्यवाही होत नाही तोपर्यंत सदर उपोषण हे सुरू राहणार आहे याची नोंद घ्यावी असेही आवाहन उपोषण करते अमोल शिवाजी जाधव राहणार तुळजापूर यांनी निवेदनात केले आहे
* *माहितीस्तव*
1) मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई
2) महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य
3) जिल्हा अधिकारी कार्यालय धाराशिव
4) उपविभागीय अधिकारी धाराशिव
5) तहसीलदार तुळजापूर
6) ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालय सिंदफळ ता .तुळजापूर
7) दुय्यम निबंधक कार्यालय तुळजापूर
8) पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन तुळजापूर
आदिंना निवेदनाची प्रत पाठवण्यात आली आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा