Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २७ जून, २०२४

*शिक्षकांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी मी नेहमी तत्पर आहे, आमदार --जयंत आसगावकर*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

सांगली जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग व सांगली जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या एक दिवशीय कार्यशाळेचे उद्घाटन पुणे विभागीय शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.पाटगांव मिरज येथील विश्वेश्वरैय्या टेक्निकल कॉलेज यांच्या वतीने सांगली जिल्ह्यातील मुख्याध्यापकांची कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते.

            आ.आसगांवकर पुढे म्हणाले की,शिक्षकांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतो.राज्य शासनाच्या शिक्षक विरोधी कोणत्याही निर्णया विरुद्ध मी शिक्षकांच्या बाजूने लढत राहीन. आमदार फंडातून जिल्ह्यातील प्रत्येक शाळांना मल्टी फंक्शनल प्रिंटर देण्यात येणार असल्याचे सांगून पुढील आठवड्यात आणखी २२८ शाळांना प्रिंटर देणार आहे.तसेच शिक्षण विभागात कोणत्याही प्रकारचा गैरकारभार चालू देणार नाही.असे स्पष्ट मत आमदार महोदयांनी मांडले . 



           या कार्यशाळेत माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगलीचे शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांनी चालू शैक्षणिक वर्षामधील शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला मुख्याध्यापकांनी आपल्या कामाचे शैक्षणिक कामाचे नियोजन करून विद्यार्थी व शाळांची गुणवत्ता वाढ करावी याबाबत मार्गदर्शन केले . जिल्ह्यातील मुख्याध्यापकांना वार्षिक नियोजन,नाविन्यपूर्ण उपक्रम,सेवा हमी कायदा व शालेय अभिलेखे इत्यादी बाबत सविस्तर माहिती दिली.शिक्षक बदल्या,फंडाच्या स्लिपा बाबतची कामे पुढील काही दिवसात पूर्ण केले जातीलअशी ग्वाही दिली. शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीलाच आयोजित केलेल्या कृती सत्रा बाबत मुख्याध्यापक संघाचे अभिनंदन केले .



            विश्वेश्वरैय्या टेक्निकल कॉलेजचे प्राचार्य डॉ.इंद्रजीत यादव -पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून कॉलेज मार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली . 

         दुपारच्या सत्रामध्ये वेतन पथक सांगली कार्यालयाकडून फंडांच्या स्लिपा,थकीत वेतन व कार्यालयाकडील विविध योजनांची माहिती देण्यात आली. सारथी शिष्यवृत्तीचे जिल्हा समन्वयक देवेंद्र पाटील यांनी सारथी व एन एम एम एस शिष्यवृत्ती संदर्भातील माहिती दिली .

        या कार्यक्रमाच्या दरम्यान मुख्याध्यापक संघाच्या वतीने मुख्यमंत्री सुंदर माझी शाळा या उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त व सासवड येथील संत सोपान काका स्वच्छ -सुंदर माझी शाळा या अभियान अंतर्गत क्रमांक मिळवलेल्या जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय शाळांचा सन्मान करण्यात आला.यावेळी विश्वेश्वरैय्या कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजनामधील विशेष कामगिरी बजावलेल्या विद्यार्थ्यांना आ. जयंत आसगांवकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले . 


        या कार्यशाळेचे प्रास्ताविक सांगली जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अमृत पांढरे यांनी केले.जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव संजयकुमार झांबरे यांनी मुख्याध्यापक संघाच्या कामाचा आढावा घेतला व विविध शैक्षणिक समस्या बाबत आमदार महोदयांना माहिती दिली.मिरज हायस्कूल,मिरजचे मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

          यावेळी कार्यशाळेसाठी शिवगंगा चारिटेबल ट्रस्ट सांगलीचे कार्यकारी संचालक बाळासाहेब इंगवले,जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष अरविंद कदम,कोषाध्यक्ष डी.एन.पाटील जिल्हा मुख्याध्यापक संघाचे संतोष नाईक,संताजी घाडगे, विवेक कुंडले,जयसिंग पाटील, संभाजी पाटील,जीवन कांबळे, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सचिव व मोठ्या संख्येने मुख्याध्यापक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन संतोष नाईक यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा