*विशेष---प्रतिनिधी,*
*राज मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी
लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे जयंती निमित्त डॉ.धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना व छत्रपती गणेशोत्सव मंडळ अकलूज यांचे वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात १५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या शिबिराचे उद्घाटन निहानसिंह धवलसिंह मोहिते पाटील यांचे शुभहस्ते करण्यात आले.यावेळी जनसेवा संघटनेचे नेते माणिकराव मिसाळ,अकलूज नगरपरिषदेचे ओ.एस.नरोटे, अण्णासाहेब इनामदार, अण्णासाहेब शिंदे,सतिशनाना पालकर,संयोजक राजाभाऊ गुळवे,सुधीर रास्ते,मयुर माने, नवनाथ भाऊ साठे,रणजितसिंह देशमुख,संजय गाडे,जयसिंगराव मोरे,बबनराव शेंडगे,हुसेन शेख, फिरोज देशमुख,सचिन गायकवाड,रघुनाथ साठे,आप्पा जाधव,मंगेश साठे,राहुल शहाणे, सुनील जठार,सतिश साठे, बाळासाहेब शिंदे,यांचे सह जनसेवा संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.रक्त संकलनासाठी अक्षय बॅंकेचे अध्यक्ष संजय कुमार शिंदे व त्यांचे सहकारी यांनी सहकार्य केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोमनाथ बिटे,इस्लाम पठाण,मोतीलाल साळुंखे,सरदार तांबोळी,संतोष पवार,वैभव गायकवाड,राजु सुत्रावे यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा