*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
पवारवाडी तालुका जिल्हा धाराशिव येथील सन 2015 ते 2019 दरम्यान कार्यरत असलेल्या पवारवाडी ग्रामपंचायत मधील सरपंच व चार ग्रामसेवक बुरगुटे मॅडम लामतुरे साहेब गरड साहेब व सरवदे साहेब यांच्या कालावधीत आठ रजिस्टर गहाळ केल्याने त्याची चौकशी करून अहवाल सादर करून फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्रेमचंद बजरंग मुंडे रा.पवारवाडी यांनी गटविकासअधिकारी यांचे कडे केली होती त्याची
चौकशी विस्तारअधिकारी यांनी करुन करून चौकशी अहवाल सादर करणेबाबत व फौजदारी गुन्हा दाखल करणेबाबत आदेश गट विकास अधिकारी यांनी दिला आहे
याबाबत सविस्तर माहिती अशी की
1) श्री प्रेमचंद बजरंग मुंडे रा.पवारवाडी ता.जि. धाराशिव यांचे अर्ज दि. 04.03.2024
2) या कार्यालयाचे पत्र जाक्रपंसधा/पंचायत-3/कावि-622/24 दि. 21.03.2024 3) ग्रामसेवक ग्रा.पं. पवारवाडी ता.जि. धाराशिव यांचा अहवाल दि.5.4.2024
4) या कार्यालयाची मान्य टिप्पणी क्र04 दि.05.06.2024
उपरोक्त विषयी श्री. प्रेमचंद बजरंग मुंडे रा. पवारवाडी ता.जि. धाराशिव यांचे अर्ज दि. 04.03.2024 अन्यये मोजे पवारवाडी त्ता.जि धाराशिव येथील 8 अ रजिष्टर सन 2020-2021 विस्तार अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी प्रमाणित केलेले नाही, व त्या 8-अ च्या रजिष्टरवर तफावत दिसून येत आहे सरपंच ग्रामसेवक यांची सही आहे. शिक्का नाही सन 2015 ते 2019 पर्यंतचे रजिष्टर तत्कालीन सरपंच/ग्रामसेवक यांनी गहाळ केलेली आहे. याची कसून चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कार्यवाही करणे
बाबत संदर्भ क्र.01 अन्वये विनंती केली होती.
त्यानुसार तक्रारीच्या अनुषंगाने सरपंच, ग्रामसेवक ग्रा.पं. पवारवाडी ता. जि.धाराशिव यांना प्रकरणी स्वयंस्पष्ट अभिप्रायासह खुलासा
सादर करणे बाबत संदर्भ क्र. 02 अन्वये सुचित करण्यात आले होते.
त्याअनुषंगाने ग्रामसेवक ग्रा.पं. पवारवाडी ता.जि.धाराशिव यांनी सन 2015 ते 2019 पर्यंतचे रजिष्टर तत्कालीन सरपंच ग्रामसेवक यांनी गहाळ केलेली आहे सदरच्या कालावधी मधील ग्रा. पं. कार्यालयाच्या अभिलेख्यात्ररुन, बुरगुटे मॅडम, लामतुरे साहेब, गरड साहेब सरवदे साहेब, यांच्या तत्कालीन चार ग्रामसेवक यांचा कालावधी सन 2015 2019 पर्यंत दिसुन येत आहे तेव्हा कोणत्या ग्रामसेवक यांनी कोणाकडे पदभार देण्यात आला आहे. तसेच संबधी 8 अ रजिष्टर हे पदभार मध्ये कोणाकोणाकडे देण्यात आलेले आहे याविषयी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून चौकशी करून योग्य तो निर्णय घेणे आवश्यक आहे असा खुलासा संदर्भ क्र. 03 नुसार सादर केला आहे.
करिता आपणास संदर्भ क्र.01 च्यापत्रान्वये प्राप्त झालेल्या तक्रारी अर्जाची छायांकित प्रती देऊन सुचित करण्यात येते को, विषयांकित प्रकरणी मुदतीत चौकशी करुन स्वयंस्पष्ट अभिप्रायासह चौकशी अहवाल सादर करावा. विलंबाची जबाबदारी आपणावर राहील याची नोंद घ्यावी अशी सुचना
(आर.एस. कांबळे) गट विकास अधिकारी पंचायत समिती, धाराशिव यांनी केली आहे
आधिक माहितीस्तव
प्रतः- 1. मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं) जि.प. धाराशिव यांना माहितीस्तव सादर.
2. सरपंच, ग्रामसेवक ग्रा.पं. कार्यालय पवारवाडी ता.जि. धाराशिव यांना देऊन सुचित करण्यात येते की, चोकरी कासी वि.अ. (प) यांना आवश्यक ते अभिलेख मागणी प्रमाणे उपलब्ध करून देण्यात यावेत 3. श्री. प्रेमचंद बजरंग मुंडे रा. पवारवाडी ता. जि. धाराशिव यांना माहितीस्तव
सादर केले आहे
(आर. एस. कांबळे गट विकास अधिकारी पंचायत समिती, धाराशिव
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा