*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
नीट युजी 2024 परिक्षेत दिलेल्या ग्रेस मार्क्स संदर्भात आढावा घेऊन त्या संदर्भात उच्च स्तरीय समितीमार्फत तात्काळ कार्यवाही करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी खासदार ओम प्रकाश निंबाळकर यांनी महासंचालक नॅशनल टेस्टिंग एजन्सी नवी दिल्ली यांना दिलेल्या निवेदनात मागणी केली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे
की, नॅशनल टेस्टिंग एजन्सी न्यू दिल्ली यांच्याकडून दि. 05/05/2024 रोजी भारतातील 571 शहरातील एकूण 4 750 केंद्रावर 24 लक्ष 6 हजार 79 विद्यार्थ्यांपैकी 23 लक्ष 31 हजारे 297 विद्याथ्यांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेच्या निकालाचे अपेक्षित दिनांक 14 जून 2024 ही असताना संबंधित एजन्सीतर्फे या परीक्षेचा निकाल दिनांक चार जून 2014 रोजी जाहीर करण्यात आला. या परीक्षेमध्ये भारतातून 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क्स मिळाले आहेत. 1500 अधिक विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स दिलेले आहेत. विद्यार्थ्यांसह पालकांना या परीक्षेमध्ये काहीतरी गैरप्रकार झाल्याचा संशय असून हरियाणातील एका केंद्रावरील प्रश्न पत्रिका उशिरा दिल्याचे कारण देऊन ग्रेस मार्क दिल्यामुळे चार विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क मिळालेले आहेत. सदर परीक्षा ही व्यावसायिक परीक्षा सिस्टिम ऑफ एलिमिनेशन वर आधारित असून बऱ्याचशा विद्यार्थ्यांना 718 व 719 असे गुण प्रदान करण्यात आल्यात यामुळे च पालक व व विद्यार्थ्यांमध्ये या परीक्षांमध्ये गैरप्रकार झाले असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे पालकांकडून व विद्यार्थ्यांकडून सदर परीक्षा रह करून पुन्हा परीक्षा घेण्याबाबत विनंती करण्यात येत आहे. ही परीक्षा भारतातील सर्वात मोठी परीक्षा असण्याबरोबर वैद्यकीय व्यावसायिक शिक्षण घेणे करिता अत्यंत महत्त्वाचे समजले जाणारे परीक्षा आहे. या परीक्षेतील दिलेल्या ग्रेस मार्क्सचा आढावा घेणे संदर्भात उच्चस्तरीय समिती या समितीमार्फत
तात्काळ कार्यवाही करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याबाबत मागणी करण्यात आली आहे त्या अनुषंगाने आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी "खासदारओमप्रकाश निंबाळकर यांनी निवेदना द्वारे केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा