Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १२ जून, २०२४

*वीज वारा वादळ अतिवृष्टी चक्रीवादळ यापासून मनुष्य पाळीव प्राणी राष्ट्रीय संपत्ती याचे संरक्षण व हवामान चे चांगले ऑनलाईन मोबाईलवर दामिनी ॲपचा वापर करा--- सतीश कचरे ,मंडल कृषी अधिकारी*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448

विजा , वारे , पाऊस, गारपीठ अतिवृष्ठी यांचे अंदाज वर्तविला आहे. प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून अमुल्य मानव जात , मौल्यवाण पशुधन , राष्ट्रीय संपत्ती चे संरक्षण करणेसाठी सर्वानी विज पूर्वकल्पना देणारे दामिनी ॲप अपलोड करावे .

शेतकऱ्यांना विजांसह होणाऱ्या पावसाचा अंदाज कळावा तसेच अंदाजाप्रमाणे शेती आणि शेतातील कामाचे यथोचित नियोजन करण्यासाठी भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान संस्थेने ‘दामिनी हे मोबाईल ऑप्लिकेशन विकसित केले आहे.

दामिनी या मोबाईल ऑप्लिकेशनमुळे शेतकरी बांधवांना वादळी पाऊस तसेच विजेच्या कडकडाटाचे पूर्वानुमान अर्धा ते एक तास आधी मिळणार आहे.

भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान संस्थेने दामिनी मोबाईल अँप्लिकेशन विकसित केले असून त्याच्या वापरामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, पशुधन तसेच शहरी भागातील विजेच्या कोसळण्यामुळे होणारे नागरिकांचे मृत्यू टाळण्यास मदत होणार आहे.



उष्ण कटिबंधीय हवामान संस्थेने दामिनी या मोबाईल अँप्लिकेशनसाठी लाईटनिंग लोकेशन मोडेल विकसित केले असून माहितीचे संकलन करण्यासाठी निरनिराळ्या भागात सेन्सर बसविले आहे.

दोनशे कि.मी. पर्यंत होणाऱ्या विजेच्या घडामोडी जाणून घेण्याची क्षमता ही प्रत्येक सेन्सर मध्ये आहे

दामिनी या मोबाईल ऑप्लिकेशनद्वारे शेतकरी तसेच नागरिकांना विजांच्या कडकडाटाचा अंदाज अर्धा तास आधी मिळत असल्यामुळे त्यांना शेतात काम करताना सुरक्षितस्थळी जाणे शक्‍य होणार आहे.

वादळी वाऱ्यांबरोबर होणारा पाऊस आणि वीज कोसळण्याच्या संभाव्य आपत्ती टाळणे शक्‍य होणार आहे. यासाठी दामिनी अँप अन्डॉईड मोबाईल मध्ये डाऊनलोड करून वापर करण्याचे अहवान शेतकरी व शेतमजूर बंधूनी करावे असे अहवान मंडळ कृषि अधिकारी नातेपुते यांनी केले आहे.

दामिनी अँप डाऊनलोड करण्यासाठी इथे लिंक करावे


https://play.google.com/store/apps/details?id=com.lightening.live.damini २ - ज्यांची आपण चातकासारखी वाट बघत होते तो पावसाळा हंगाम सुरू झाला आहे . पावसाळा म्हटल की कमी दाबाचा पट्टा , वारे ' वादळ ' वादळी वारे , चक्रीवादळ, वीज कडकडाट, चमकने , पडणे अतिवृष्टी पुर या नैसर्गिक आपत्तीला शेतकरी बाधवास ह सर्व अबाल वृद्ध याला बळी पडतात पडावे लागते यामुळे जीवीत हानीसह संपत्ती, पशुधन इत्यादीचे न भरुण काढण्याचे नुकसान व हाणी होते या सर्व हवामान घटक बाबीची पूर्व कल्पना या आधूनिक युगात शास्त्रीय अभ्यास सह २४ तास अगोदर मिळाली तर नक्कीच आपण प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाय व उपाययोजना करून हाणी टाकू शकतो त्यासाठी हवामान घटक बदल चेतावणी ॲन्ड्राईडमोबाईल वर मोबाईल सेंटींग मध्ये जाऊन वायरलेस ईमजन्सी ॲलर्ट शोधून त्यावर कि क्लीक करावे . ईमजन्सी नोटीफिकेशन ऑन करून जर तुमच्या मोबाईल मध्ये अनेक लोकेशन जतन / सेव्ह असतील तर ठरावीक लोकेशनला ॲक्सेस देऊन म्हणजे वारे, वादळ अतिवृष्टी चक्रीवादळ नोटीफिकेशन प्राप्त होईल व या आधारे कुटूंब सह स्वतः पशुधन व नैसर्गिक संपत्ती वाचविणे व संरक्षणासाठी प्रतिबंधात्मक व उपाचारात्मक उपाय करून जीवित हाणी टाकून राष्ट्रीय सार्वजनिक वैयाक्तिक सामुहीक सपत्ती चे संरक्षण करता येईल .शुभस्य शीघ्रम प्रतिबंधात्मक उपाय काळाची गरज !


* *सेवा रत्न सतीश कचरे मंडळ कृषी अधिकारी नातेपुते(ISO 9001:2015)*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा