*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
देशात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लोकसभेचे पहिले अधिवेशन येत्या (२४ जून) पासून तर राज्यसभेचे पहिले अधिवेशन ( २७ जून) पासून सुरू होणार आहे. याच अनुषंगाने संसदेच्या सुरक्षेसाठी प्रथमच CISF चे जवान तैनात करण्यात आले आहे.
परंतु सीआयएसएफला याबाबतचे अद्याप लेखी आदेश मिळाले नसल्याची माहिती देण्यात आली आहे. असे असतानाही सीआयएसएफ सुरक्षेची जबाबदारी घेणार आहे. संसद भवनात प्रवेश करताना खासदार आणि मंत्र्यांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांच्या प्रोटोकॉलमध्ये कोणतीही अडचण येणार नाही याची खात्री करण्यासाठी CISF च्या आणि संसद सुरक्षा सेवेच्या उच्च अधिकाऱ्यांनी विस्तृत व्यवस्था केली आहे.
सध्या संसद भवनाच्या सुरक्षेसाठी 2500 CISF जवान तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये कमांडोचाही समावेश करण्यात आला आहे. सीआयएसएफच्या तैनातीनंतर दिल्ली पोलीस आणि सीआरपीएफ जवानांची संख्या कमी करण्यात आली आहे. संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कोणतीही चूक होऊ नये यासाठी सीआयएसएफ आणि संसद सुरक्षा सेवेचे वरिष्ठ अधिकारी ज्या गेटमधून खासदार आणि मंत्री प्रवेश करतील त्या गेटवर तैनात केले जाणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार,संसद भवनात प्रवेश करण्यापूर्वी कोणत्याही खासदार किंवा मंत्र्याचा पास स्कॅन केला जाणार नाही. पूर्वीप्रमाणेच त्या सर्व सुरक्षा अधिकाऱ्यांना प्रवेशद्वारावर तैनात केले जाणार आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर सर्व खासदार आणि मंत्र्यांची ओळख सुनिश्चित करून आपले काम आधीच केले असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. दिल्ली वाहतूक पोलीस पूर्वीप्रमाणे वाहतूक व्यवस्था हाताळणार आहेत.
उद्यापासून संसदीय अधिवेशनाला सुरवात
18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सोमवार (24 जून) पासून सुरू होणार आहे. लोकसभेचे कामकाज सकाळी ११ वाजता सुरू होणार असून त्यामध्ये नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी होणार आहे. तर (26 जून) रोजी लोकसभा अध्यक्षांची निवडणूक पार पडणार आहे. ( 27 जून) रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा