Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २४ जून, २०२४

*संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील जंक्शन च्या कामामुळे अकलुज ते टेंभुर्णी रोडवरील वाहतुक मार्गात बदल*

 


*विशेष---प्रतिनिधी,*

*राज मुलाणी*

*टाइम्स 45 न्युज मराठी

संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील इंदापूर ते तोंडले या महामार्गाचे काम सध्या सुरू असून जुलै 2024 मध्ये पालखी सोहळ्यापूर्वी अकलूज येथील नवजीवन हॉस्पिटल अकलाई कॉर्नर जवळ जंक्शन करण्या चे काम सुरू असल्याने आक्रोश टेंभुर्णी रोडवरील वाहतुकीत बदल केले असल्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण शिरीष सरदेशपांडे यांनी दिली ती पुढील प्रमाणे

ज्या अथों प्रभारी अधिकारी, अकलुज पोलीस ठाणे यांनी त्यांचेकडील पत्र जावक क्रमांक २५६२/२०२४ दिनांक २४/०६/२०२४ अन्वये तसेच जी एच व्ही इंडिया प्रा. लि. मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक जो एच व्ही/अकलूज पोलीस ठाणे/आय टी आर टी/२०२४/२५७२४ दि. १८/०६/२०२४ अन्वये जी एच व्ही इंडिया प्रा. लि. मुंबई या कंपनी मार्फत संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग इंदापूर ते तोंडले या महामार्गाचे काम सध्या सुरू आहे. जूलै २०२४ मध्ये पालखी सोहळयापुवी नवजीवन हॉस्पीटल अकलाई कॉर्नरजवळ जंक्शन करण्याचे काम सुरू आहे. सदरचे काम पालखी सोहळयापुर्वी पूर्ण करण्याच्या सुचना मा. जिल्हाधिकारी सोलापूर यांनी दिलेल्या आहेत. सदरचे काम करतेवेळी टेंभूर्णी ते अकलुज व अकलुज ते टेंभूणों या रहदारी मुळे काम करण्यास अडथळा होत असल्याने सदर जंक्शनचे काम करणेसाठी दिनांक २५/०६/२०२४ रोजीचे १६:०० ते दिनांक २६/०६/२०२४ रोजीचे २०:०० वा. दरम्यानचे कालावधीत वाहतुकीस बाहय वळन देवून रहदारी वळविणे आवश्यक असल्याचे आमचे निदर्शनास आणून दिलेले आहे.



याअथी मी शिरीष सरदेशपांडे पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ च्या कलम ३३ (१) (ब) अन्वये मला प्राप्त असलेल्या शक्तीच्या आधारे दिनांक २५/०६/२०२४ रोजी १६:०० ते २६/०६/२०२४ रोजी २०:०० वाजेपर्यत अकलूज ते टेंभूर्णी व टेंभूर्णी ते अकलूज या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतुक बाहयवळणाने वळविणेकरीता उपलब्ध असणारे पर्यायी मार्गाचा वापर करतील असा आदेश देत आहे.

अकलुज मधील कर्मवीर चौक (मसुदमळा)

रहदारीत करण्यात येणारा बदल

अकलूज कडून टेंभूर्णी कडे जाणारी वाहने अकलूज महाळूग २५/०४, लवंग मार्गे टेंभूणों कडे जातील तसेच माळीनगर कडे जाणारी स्थानिक वाहने महाळुंग रस्ता, पांढरे वस्ती मार्गे माळीनगरकडे जातील.

२५/४ चौक, लवंग (महाळुंग कडे जाणारा चौक)

टेंभुर्णी कडून अकलुजकडे येणारी वाहने २५/०४ लवंग, महाळुंग बाबरी पुल मार्ग अकलुज शहरात येतील,

माळीनगर

माळीनगर ते अकलुज व अकलुज ते माळीनगर अशी स्थानिक वाहतुक माळीनगर पांढरे वस्ती मार्ग अकलुज कडे येतील व अकलूज कडून माळीनगर कडे जातील

सदरचा आदेशाचा अंमल हा दिनांक २५/०६/२०२४ रोजी १६:०० वा. पासुन ते २६/०६/२०२४ रोजी २०.०० वा पर्वत अंमलात राहील.


सदरचा आदेश हा पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण शिरीष सरदेशपांडे यांनी सही व शिक्क्यानिशी दिला आहे


. मा. जिल्हाधिकारी सो सोलापूर यांचेकडे माहितीसाठी व पुढील कार्यवाहीसाठी 

२. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अकलूज यांचेकडे माहितीसाठी

३. उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलुज उपविभाग अकलुज यांचेकडे माहितीसाठी व पुढील कार्यवाहीसाठी

४. अकलुज पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सोलापूर ग्रामीण यांचेकडे माहितीसाठी व पुढील कार्यवाहीसाठी

५. जिल्हा माहिती अधिकारी सोलापूर यांचेकडे दैनिक वर्तमानपत्रात प्रसिध्द करणेसाठी रवाना .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा