*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
पुणे - 17 जून :* पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी नर्हे परिसरातील एका गोडावूनवर छापा टाकून 300 गुटख्यांची पोती जप्त केली आहे. याची किंमत 1 कोटी 39 लाख रुपये असून, याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले की, गोपनीय माहितीच्या आधारे नर्हे भागातील एका गोडाऊनवर छापा टाकण्यात आला. तिथे 300 गुटख्यांनी भरलेली पोती आढळून आली. कारवाईवेळी गोडाऊनच्या मागे गुटखा बनविण्याचा कारखाना होता. कारखान्यातून गुटखा तयार करण्याची सामुग्री व उपकरणे जप्त करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून कारखाना व गोडाऊनचा मालक पुष्पेंद्र सिंग याच्यासह चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी हा गुटखा अहमदनगर, नाशिक, सातारा या ठिकाणी विक्रीसाठी पाठविण्याच्या तयारीत होते. अटकेतील सर्वांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. यामधून पोलिसांना आणखी माहिती मिळण्याची शक्यता आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा