उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्यूज मराठी
माळशिरस तालुक्यातील पुर्व भागातील तांबवे (पायरी पूल) येथे एकमुखी दत्त मंदिरात वट पोर्णिमे निमित्त ह.भ.प.पूनमताई साळुंखे यांचे वट पोर्णिमेचे महत्व यावर सुमधुर किर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या दत्त मंदिराचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व माजी सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख यांच्या शुभहस्ते झाले होते.तर मंदिराशेजारी जागेत मठाच्या बांधकाम सुरू करण्यात आले आहे.त्याचे भूमिपूजन युवा नेते शिवतेजसिंह मोहिते पाटील व स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते.या मंदिरात दत्त महाराजांच्या दर्शनासाठी माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे,माढ्याचे तात्कालीन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मदनसिंह मोहिते- पाटील,माळीनगर साखर कारखान्याचे एमडी रंजनभाऊ गिरमे,पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी,ब्रीमा सागराचे एमडी बेंबळकर साहेब व तसेच अनेक मान्यवर येऊन गेले आहेत.
शुक्रवारी २१ तारखेला वट पौर्णिमेला दत्त मंदिरा शेजारी असलेल्या वडाच्या वटवृक्षास महिलांनी सात फे-या मारून ह.भ.प.पूनमताई साळुंखे यांचे सुश्राव्य किर्तनाचा लाभ घ्यावा.हा दुग्ध शर्करा योग जुळून आला आहे तरी महिला व पुरुष भाविकांनी यांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.सध्या दत्त मंदिरासमोर आनंद धाम मठ उभारण्याची अत्यंत आवश्यकता आहे.तरी दानशूर व्यक्तींनी व भक्तगणांनी या चांगल्या कार्यासाठी सढळ हाताने मदत करून आनंद धाम मठ पुर्ण व्हावे अशी भाविकांची इच्छा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा