*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
6जून रोजी दुर्गराज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा मा. खा. संभाजीराजे छत्रपती व महाराणी सौ. संयोगिताराजे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय श्रीशिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या लाखो शिवभक्त मावळ्यांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे, प्रतीवर्षाप्रमाणे आज रोजी तुळजापूरकरांना मिळालेल्या सेवेनुसार किल्ले रायगडाची गडदेवता आई शिर्काई देवीला मानाची साडीचोळी, तुळजाभवानी मातेचे कुंकू,राजसदरेवरील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, होळीच्या माळावरील मूर्ती, शिर्काई देवी, जगदीश्वर व छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आणि अभिषिक्त चांदीची मूर्ती यांच्यासाठी कवड्याच्या माळा इ. पूजा साहित्य आज तुळजाभवानी मंदिरातून मंदिरचे धार्मिक व्यवस्थापक श्री. विश्वास कदम, पुजारी मंडळ मा. अध्यक्ष किशोर गंगणे, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्रीकांत कदम, तालुकाध्यक्ष सचिन ताकमोगे, विठ्ठल बाराते यांचे हस्ते सोहळ्याचे मानकरी, शिवराज्याभिषेक सोहळा समिती सदस्य सतीश खोपडे सर यांचेकडे विधिवत सुपूर्द करण्यात आले. यावेळी प्रदीप अमृतराव,उदय साबळे, साईराज खोपडे, कुमार टोले तसेच भूम, बार्शी आणि तुळजापूर मधील पुजारी बांधव, शिवभक्त उपस्थित होते. यावेळी 6जून रोजी या सोहळ्यास जिल्ह्यातील शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा