*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
अकलूज पोलीस ठाण्याच्या हद्दित गेल्या चारपाच दिवसात अज्ञात इसमांनी आठ मोटारसायकली पेटवून देवुन सुमारे तीनचार लाखाचे नुकसान झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात झालेली असुन पोलीसांची गस्त चालू असताना देखील असे प्रकार घडत असल्याने नागरीकात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
अकलूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या देशमुखमळा, चौडेश्वरवाडी या भागात अज्ञात इसमांचा धुमाकूळ चालू असुन गेल्या चारपाच
दिवसापासून असे प्रकार चालू आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास कोणीतरी भीती व दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने कोणीतरी जाणूनबुजून असे प्रकार करीत आहे. अकलूज पोलीस या घटनांची नोंद असुन डीवायएसपी नारायण शिरगावकरव वरीष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास निंबोरे-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पीएसआय बबनराव साळुंखे, पीएसआय श्रीकांत निकम व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा