Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २२ जून, २०२४

*यावर्षीच्या सौदी अरेबिया मधील हाजीयात्रेदरम्यान 98 भारतीयांचा मृत्यू*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

*नवी दिल्ली :-* सौदी अरेबियातील मक्का येथे भारतातून हज यात्रेवर १ लाख ७५ हजार यात्रेकरू गेले होते. त्यापैकी आतापर्यंत ९८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी दिली आहे. अराफातच्या दिवशी जास्त तापमान असल्याने ६ हज यात्रेकरूंचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.

जायस्वाल म्हणाले की, नैसर्गिक आजार, जुने आजार आणि वृद्धापकाळामुळे काही लोकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये उष्माघाताचाही समावेश आाहे. अपघातात ४ भारतीयांचा मृत्यू झाला. मागील वर्षी हज यात्रेमध्ये मृत्यू झालेल्या भारतीयांची संख्या १८७ होती .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा