*' अकलुज ---प्रतिनिधी*
*लक्ष्मीकांत कुरुडकर*
*टाइम्स 45 न्युज मराठी
रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिदृतांच्या कृषी सल्ला केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, प्राचार्य आर. जी. नलावडे, प्रा. एस. एम. एकतपुरे, प्रा. एम. एम. चंदनकर, प्रा. एच. व्ही. कल्याणी यांच्या मार्गदर्शनानुसार आदित्य कारकले, प्रतिक बिरादार, तानाजी बिराजदार, अली शेख, अजिंक्य कांबळे, रोहित शिंदे, गणेश सुरवसे, करण जाधव हे कृषिदूत शेतकऱ्यांना कृषीविषयक सल्ला व मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमास सरपंच पोपट बोराटे, उपसरपंच दादा रणदिवे, ग्रामसेवक भाऊसाहेब भंडलकर, सोसायटी चेअरमन वाघमोडे , प्रगतशील शेतकरी आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा