Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २१ जून, २०२४

*स्व आणि समाजासाठी योग थीमचे अवलंबन करत महर्षी संकुलामध्ये जागतिक योग दिन साजरा* *मनातील आत्मविश्वास वाढविण्यासाठी योगच प्रभावी औषध उदय साळुंखे कृषी सहाय्यक अधिकारी*

 


*उपसंपादक----नुरजहाँ शेख*

 *टाइम्स 45 न्युज मराठी

योग का नारा है,

            भविष्य अब हमारा है। 

     शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित महर्षि संकुल यशवंतनगर येथे जागतिक योग दिन उत्साहात पार पडला .प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर यांच्या मार्गदर्शनाखाली योग दिनानिमित्त योगा प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.



कार्यक्रमाप्रसंगी उदय साळुंखे कृषी सहाय्यक अधिकारी ,जेष्ठ विधीज्ञ नितीनराव खराडे ,अनिल जाधव ,कैलास चौधरी यांच्या शुभहस्ते माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील व रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले .सर्व प्रमुख मान्यवरांचा सन्मान समारंभ संकुलाच्या वतीने संपन्न झाला.

उदय साळुंखे कृषी सहाय्यक अधिकारी मार्गदर्शन करताना म्हणाले ,योगसाधनेचे मूळ उगमस्थान भारत देश आहे .मनातील आत्मविश्वास वाढवण्यासाठी योगच प्रभावी आहे.



     संकुलातील प्राध्यापक धनंजय देशमुख एम .ए .योगशास्त्र यांनी आपल्या मनोगतातून *स्व आणि समाजासाठी योग* यावर्षीची थीम असल्याचे सांगितले .सर्वेक्षणानुसार आयटी कंपन्यातील घटत्या उत्पादन क्षमतेला सुधारण्यासाठी तरुणाईने योग करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आपल्या मनोगतातून केले. आपल्या टीमच्या माध्यमातून ताडासन, पद्मासन ,वज्रासन, हलासन अशा विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादरीकरण केले .त्याचप्रमाणे ओंकार ,प्रार्थना, पूरक हालचाली, सूर्यनमस्कार प्राणायाम ,ध्यान ,योगनिद्रा आणि विविध योगासने करण्यात आली.



    कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापक भारत चंदनकर, पर्यवेक्षक अंकुश एकतपुरे शिक्षक प्रतिनिधी शिवाजी थोरात, सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी योगाचे प्रात्यक्षिक करत उपक्रमात आपला सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश सोनवणे तर आभार प्रभावती लंगोटे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा