*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
माळशिरस तालुक्यातील मंडळ कृषि अधिकारी नातेपुते अधिनस्त २६ गावापैकी दिनांक २३ मे २०२४ च्या वादळी वारे व पूर्व मान्सुन मुळे दहीगाव, फोडशिरस, मोटेवाडी फो , लोणंद, लोमोवाडी, या गावामध्ये व नातेपुते, पिरळे, बागडे, पळसमंडळ ' फडतरी या गावाचा वरील गावालगतचा दक्षिण उत्तर भागामध्ये ८३५ शेतकऱ्याचे ५६८ .८० हे क्षेत्रावरील डाळीब ६४४ लाभार्थी ४५३ हे , आंबा १२ लाभार्थी ७ .५० हे, शेवगा ६१ लाभार्थी ६३ हे, केळी १३ लाभार्थी ९ हे व पपई १२ लाभार्थी ८हे व पेरू सिताफळ ' ड्रॅगन फ्रुट' का लिंबू , भाजीपाला, ऊस, कडवळ इत्यादी पिकाचे झाडे उन्मळून पडणे, झाडे व फादया मोंडणे , फळगळ, फुलगळ, शेगागळ, केळी पिचकणे मोडणे, पाने फाटणे , इत्यादी प्रकारे ३३% पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. या नुकसान बाबीचे प्रत्यक्ष प्रक्षेत्र भेटीसह गावकामगार तलाठी, ग्रामसेवक ' कृषि सहायक यांनी प्राथमिक नजर अंदाज करून माहिती संकलीत केली आहे व जबाब व पंचनामा प्रक्रिया प्रगती पथावर आहे . कृषि विदयापीठ व संशोधन संस्था शिफारसी - १ - फळपिकाला उदा डाळीब व इतर फळपिकास २x २ x २ फुटाचा खडडा घेऊन लागवड करावी . शेतकरी बांधवांनी शेतात सरी सोडून किवा गादी वाफा करून लागवड केल्याने फळ पिके मुळे वरच्या स्थरात वाढतात खोलवर न गेलेमुळे वाढळी वाऱ्यामध्ये उन्मळून पडतात . २ - केळी, पपई फळपिके, भाजीपाला पिकास वाऱ्यापासून सरक्षण करण्यास पश्चिम दिसेला वाराप्रतिबंधक वृक्ष लागवड उदा - शेवरी करण्याची शिफारस आहे शेतकरी बांधव याचा वापर करत नसलेमुळे केळी पाने फाटणे पपई केळी बुंधा मोडणे पिचकणे भाजीपाला ओळ ची ओळ खाली लोळणे इत्यादी नुकसान होते . ३ फळपिके बहुवार्षिक पिके आहेत पिकात हवा खेळती राहावी झाडां चा हवेला अटकाव होऊ नये म्हणून नेहमी पूर्व पश्चिम ओळी करून लागवड करण्याची शिफारस आहे परंतू शेतकरी यांचा अवलंब करत नसलेमुळे फळझाडे वादळी वाऱ्यामुळे पडण्याचे प्रमाण वाढले आहे . ४ - ॲन्टी हेल नेट ' प्रोटेक्शन पेपर ह्याचा पिकाच्या ओळी वरती मंडप करून वापर करण्याची शिफारस आहे परंतू शेतकरी बांधव याचा वापर करून पूर्ण झाड व ओळ लपेटून टाकल्यामुळे वादळी वाऱ्यास प्रतिबंध झालेमुळे अख्खी लाईन झोड उन्मळून पडण्याचे प्रमाण वाढले आहे . तरी वरील तंत्रज्ञान वापर अभाव किंवा चुकिच्या पद्धतीने वापर यामुळे बहुवार्षिक पिकाचे नुकसान होत आहे तरी बांधवांनी कृषि विद्यापीठ व संशोधन संस्था यांच्या शिफारस वापर केल्याने आत्मकालीन परिस्थितीत नक्कीच नुकसान होणार नाही . हवामान घटक बदल या मुळे होणारे नुकसान टाळणेसाठी वरील शिफारसी वापरणे काळाची गरज आहे ! -श्री सतिश कचरे मंडळ कृषि अधिकारी नातेपूते ( ISO 9 0 0 1 : 2015 )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा