*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
सामान्य जनतेला शासन दरबारी न्याय व सन्मान मिळावा असे प्रशासन पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे होते असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवती काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर यांनी पवारवाडी ता. जि. उस्मानाबाद येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 व्या जयंतीनिमित्त बोलताना व्यक्त केले
प्रारंभी अहिल्यादेवी प्रतिमेचे पूजन सक्षणाताई यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले तसेच पवारवाडी येथील उज्वल यश प्राप्त केलेल्या साक्षी रवींद्र मेटकरी ,पायल शशिकांत काळे, सायली सुनील शिंदे आणि राधा सतीश काळे निकीता धनंजय मुंढे या विद्यार्थिनींचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला
पुढे बोलताना सक्षणाताई म्हणाल्या की ज्याच्या मनगटात बळ, बुद्धी चातुर्य आहे तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो. असा संदेश देणाऱ्या आणि ज्याच्या कृतीशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने केला जातो आणि सर्वधर्मसमभाव, अस्पृश्यता उच्चाटन, सामाजिक एकात्मता, स्त्री-पुरुष समानता, गोरगरिबा विषयी आत्मीयता, हुंडा पद्धतीचे उच्चाटन, आशा अनेक आनिष्ट परंपराचा बिमोड करणाऱ्या अहिल्यादेवी यांचे विचार आत्मसात करणे काळाची गरज आहे
याप्रसंगी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती समारंभाचे अध्यक्ष -लखन मेटकरी ,उपाध्यक्ष- अनिल ढाळे ,सचिव- किरण मेटकरी, सदस्य -अभिजीत पांढरे ,वैभव मेटकरी, अशोक मुंडे, जयपाल मुंडे, अश्रुबा मुंडे ,प्रेमचंद मुंडे , मुंडे, लक्ष्मण मेटकरी व पंचक्रोशीतील मंडळाचे अनेक कार्यकर्ते महिला भगिनी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा