*श्रीपूर---बी.टी.शिवशरण
आज बारा जून विजयसिंह मोहिते पाटील यांचा जन्मदिन त्यांना जन्मदिनाच्या पुर्वसंध्येला अंतःकरण पुर्वक शुभेच्छा देत असताना विजयसिंह मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील त्यांच्या कार्यकर्त्यांची विस्कटलेली मोळी व तीचा सुटलेला आळा बांधला तर अकलूजला जिल्ह्याची राजधानी ही पुसलेली ओळख पुन्हा निर्माण होऊ शकते मोहिते पाटील घराणे ही ओळख जिल्हा मर्यादित राहिलेली नाही मोहिते पाटील ही सामाजिक राजकीय वैचारिक मोठी ताकद आहे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी आपले राजकारण समाजकारण शुन्यातून उभे केले आहे त्यांनी घालून दिलेल्या सामाजिक राजकीय शैक्षणिक वैचारिक सांस्कृतिक परिवर्तनवादी विचारमंथन पाऊलवाटेने त्यांच्या पश्चात विजयसिंह व त्यांचे बंधू यांनी सहकार चळवळ गावगाडा नेतृत्व कार्यकर्त्यांना विश्वास देऊन राजकारण केले आहे विजयसिंह मोहिते पाटील यांनी अकलूजचे सरपंच ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पदापर्यंत गरडभरारी घेतली आहे त्यांच्या राजकीय वाटचालीत मोहिते पाटील यांनी जिल्ह्यात अनेक नेते कार्यकर्ते घडवले सरपंच सभापती जिल्हा परिषद अध्यक्ष चेअरमन आमदार खासदार कोणाला करायचे ही ताकद अकलूजचे मोहिते पाटील यांचे नेतृत्वात होती पण राजकारणात ते शेवटपर्यंत टिकतेच असे नाही परिवर्तन बदल राजकीय घडामोडी व नेतृत्व बदल हा राजकारणाचा ढासळता साचा मानला जातो तद्वतच मोहिते पाटील यांचे नेतृत्व वाटचालीत दिसून आले काही इधर काही उधर हा दलबदलू कार्यकर्त्यांचा नेत्यांचा स्वभाव व वाटचाल असल्याने मधल्या काळात मोहिते पाटील यांचे हातातून जिल्हा नेतृत्वाचा लगाम निसटला आहे मोहिते पाटील यांनीही शरद पवार यांची साथ सोडून भाजप मध्ये प्रवेश केला होता भाजप ने रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेवर घेतले त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अनेक घडामोडी झाल्या तो पर्यंत पुला खालून बरेच पाणी वाहून गेले आहे राजकारणात कालचा शत्रू आज मित्र बनतो तर आजचा मित्र उद्या शत्रू असू शकतो मोहिते पाटील यांनी ज्यांना जिल्ह्यात सत्तेच्या पदांवर बसवले होते ते त्यांच्या विरोधात जाऊन मोहिते पाटील यांना विरोध करतात गेली तीस वर्षे मोहिते पाटील यांचे पारंपरिक राजकीय विरोधक असलेले उत्तम जानकर यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील गटाबरोबर जुळवून घेतले दोघांत समझोता झाला आमदार रणजितसिंह मोहिते पाटील वगळता मोहिते पाटील घराणे यांनी या वेळी लोकसभेला रणजितसिंह नाईक निंबाळकर उमेदवार नको म्हणून भाजपकडे तक्रार केली पण भाजपचे केंद्रीय नेतृत्वाने लोकसभेला तिकीट वाटपात मोहीते पाटील यांना नको असलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच पहिल्या यादीत स्थान देऊन माढा लोकसभा मतदारसंघात निंबाळकर यांना फायनल उमेदवारी दिल्याने मोहिते पाटील घराण्याचे राजकीय सामाजिक किंग मेकर जयसिंह ऊर्फ बाळदादा यांनी भाजपच्या विरोधात जाण्याची भुमिका घेतली व धैर्यशील मोहिते पाटील यांना माढा लोकसभेसाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी घेतली व प्रचाराची सर्व सुत्र त्यांनी स्वतःकडे घेऊन धैर्यशील मोहिते पाटील व सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देऊन त्यांनाही निवडून आणण्याची मोठी जबाबदारी मोहिते पाटील यंत्रणेकडून घेऊन त्यांना निवडून आणले मोहिते पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे त्यामुळे आता त्यांच्या कार्यकर्त्यांची आग्रही मागणी अशी आहे की मोहिते पाटील आता पुर्ण ताकदीने राजकारणात उतरले आहेत तर पुन्हा अकलूजला सामाजिक राजकीय व नेतृत्व गतवैभव मिळवायचे असेल तर कार्यकर्त्यांची विस्कटलेली मोळी व सुटलेला मोळीचा आळा बांधला पाहिजे लोकसभा निवडणुकीत त्यांच्या ताकदीचा अंदाज सर्वांना आला आहे माळशिरस माढा करमाळा पंढरपूर सांगोला मोहोळ मंगळवेढा बार्शी फलटण माण तालुक्यात मोहिते पाटील यांनी लक्ष घालुन राजकीय ताकद मजबूत केली पाहिजे हा संकल्प विजयसिंह मोहिते पाटील यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने सोडला जावा अशी मागणी असंख्य मोहिते पाटील प्रेमी कार्यकर्त्यांची आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा