*अकलुज ----प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी
माळशिरस तालुक्यातील निमा संघटना,होमिओपॅथी संघटना व शिर्के सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल हार्ट अँड आय केअर सेंटर अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने कृष्णप्रिया हॉल अकलूज येथे आयोजित करण्यात आले होते.अकलूज पंचक्रोशीतील वैद्यकीय क्षेत्रामध्ये अल्पावधीतच हृदयरोग तज्ञ म्हणून नावलौकिक मिळवणारे डॉ.सचिन शिर्के यांनी हृदयरोग व डॉ.सौ.चैताली शिर्के मॅडम यांनी मोतीबिंदू निदान व उपचार या विषया वरती दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये उपयोगी असे मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाप्रसंगी आपला माणूस व जनतेच्या मनातील खासदार म्हणून ओळखले जाणारे सर्वांचे लाडके खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा माळशिरस तालुक्यातील जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन तर्फे विशेष सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, अकलूज व परिसरातील सर्व पॅथीचे डॉक्टर एकदिलाने उच्च प्रतीची वैद्यकीय सेवा देत असल्यामुळे अकलूजला मेडिकल हब म्हणून ओळखले जाते आहे असे आवर्जून सांगितले.नुकत्याच पार पडलेल्या नीट परीक्षेमध्ये निमा आणि होमिओपॅथी संघटनेच्या सदस्यांच्या पाल्यांनी विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल डॉक्टर पाल्य व पालक यांचा सत्कार खा.धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यामध्ये चि.अर्णव सचिन दोशी (६९५),चि.अथर्व सुनील चव्हाण (६७२),कु.सई पांडुरंग गायकवाड (६४६),कु.धनश्री नंदकुमार जगताप (६३५),चि. सुजित धनाजी देशमुख (६३१),कु वेदांकीता सुरेश पाटील (६२६),चि सोहम नानासाहेब महामुनी (५९९),चि.आरुष राजेश एकतपुरे (५९९),कुणाल दिलीप वाघमोडे (५८५),नमो अनुप गांधी (५६०),,कु.उन्नती निवांत हराळे जेईई ९६.८ % डॉ.प्रवीण पाटील आणि डॉ.कविता पाटील यांची अमेरिका येथील बाल्टीमोर मेरीलँड येथे अमेरिका सोसायटी ऑफ कोलान अँन्ड रेक्टल सर्जरी च्या २५ व्या कॉन्फरन्समध्ये क्षार सूत्र या विषयावर पेपर प्रेझेंटेशन केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.दिलीप पवार यांनी केली. सर्वांची वेदना हरण करणाऱ्या डॉक्टरांच्या वेदना आणि प्रश्न याचा विचार खासदारांनी करावा असे आव्हान केले.डॉ.सौ.रुपाली धाइंजे व डॉ.सौ.तेजस्विनी सिद यांनी सूत्रसंचालन केले.डॉ शुभांगी माने देशमुख आणि डॉ.शबाना शेख यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय दिला तर आभार प्रदर्शन डॉ.छाया दगडे यांनी केले.निमा संघटनेचे मार्गदर्शक डॉ. तानाजीराव कदम आणि होमिओपथि संघटनेचे मार्गदर्शक डॉ.पृथ्वीराज माने पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमासाठी नातेपुते ते नेवरे येथून बहुसंखेने डॉक्टर कार्यक्रमाला उपस्थित होते. यामध्ये महिला डॉक्टर यांची बहुसंख्येने उपस्थिती होत्या.हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी निमाचे अध्यक्ष डॉ.शिरीष रणनवरे,निमा वुमन फोरमच्या अध्यक्षा डॉ.सौ.अंजली कदम व निमा टीम तसेच होमिओपॅथीचे अध्यक्ष डॉ.अभिजित राजे भोसले,होमिओपॅथी वुमन फोरमच्या अध्यक्षा डॉ.सौ.वैष्णवी शेटे व होमिओपॅथी टीम यांनी विशेष परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा