*इक्बाल बाबासाहेब मुल्ला*
*सांगली---(पञकार)
फसवणूक करणाऱ्या मॅरेज ब्युरों वाल्यां ना चाप !* बोगस मॅरेजब्यूरो (वधू - वर सूचक मंडळ ) आणि विवाह जमवणाऱ्या एजंटांना आता "चाप" बसण्याची शक्यता निर्माण झाली असून केरळ मध्ये एका तरुणाने स्थळ न काढल्याने संबंधित "मॅरेज ब्युरो" वर (ग्राहक पंचायत मध्ये ) गुन्हा दाखल केला.
वेळेत स्थळ न काढणे, फसवणूक करणे यासाठी त्या तरुणाला मॅरेज ब्युरो " ने 25 हजार दंड द्यावा असा निकाल लागला. 25 हजार आणि त्या संकेत स्थळाची 4100 ही नावनोंदणी साठी भरलेली "फी" देखील त्याला "परत" मिळाली आहे .
फसवणूक झाल्यास पालकांनी "कायदेशीर" पर्याय निवडावा !
सांगली जिल्ह्याच नव्हे तर संपूर्ण भारतात फसवणूक करणाऱ्या व खोटी आमिषे दाखवणाऱ्या मॅरेज ब्युरो - एजंट यांच्याविरुद्ध कायदेशीर दाद मागण्याचा मार्ग "खुला" झाला असून बोगस संकेतस्थळ असणाऱ्या आणि विवाह जमवून देतो असे सांगत पालकांची दिशाभूल करणाऱ्या मॅरेजब्युरो आणि एजंटांचे धाबे आता दणाणले आहे.
विवाह जमवून देतो असे अधिकृत सांगणाऱ्या आणि "अव्वाच्या सव्वा फी" घेऊन स्थळ न काढणाऱ्या मॅरेज ब्युरो विरोधात आता पालकांनी एकजुट दाखवण्याची नितांत "गरज" निर्माण झाली आहे.
" ग्राहक पंचायत" एक सोपा पर्याय !
पालकांची फसवणूक झाली असेल,आणि एजंट आणि मॅरेज ब्युरो त्यांना वारंवार टाळाटाळ करत असतील तर पालकांनी तात्काळ ग्राहक पंचायत मध्ये अर्ज करावा.
ग्राहक पंचायत येथे साधा एक "अर्ज" केला तरी संबंधित एजंट किंवा वधू वर सूचक मंडळ यांच्यावर खटला दाखल होतो. आणि फसवणूक आणि "मानसिक" त्रास दिला म्हणून दंड स्वरूपात पैसेही मिळतात. फक्त्त तीन ते सहा महिन्यात याचा निकाल लागतो . सांगलीत बिग बझार,आयुक्त बंगला समोर , टी.व्ही.एस. शोरूम मागे माधवनगर रोड ,सांगली येथे ग्राहक पंचायत उपलब्ध आहे.प्रत्येक शहरात असे ग्राहक पंचायत उपलब्ध असतात.
नवीन ट्रेंड - 3 महिन्याला 300 ते 1500 भरा व्हाट्सअप ग्रुप वर स्थळ पहा!
"आसान निकाह" अवघड करून पालकांना मानसिक त्रास देणाऱ्या व्हाट्सअप ग्रुप चे "पेव" आज चांगलेच "फोफावले" आहे.
आज महाराष्ट्रात अनेक संकेतस्थळांच्या माध्यमातून व "बोगस एजंटांच्या" माध्यमातून "फसवणुकीचे" अनेक फ़ंडे तयार झाले आहेत. 3 महिन्याला 400 रुपये भरा, विवाह व्हाट्सअपग्रुप मध्ये आपला क्रमांक "ऍड" करतो असे सांगितले जाते. कित्येक एजंटांनी पैसे मिळवण्याचा हा नवीन "प्रकार" आणला आहे .
"मुस्लिम रिश्ते सांगली हा " मोफत व्हाट्सअप " ग्रुप !
महाराष्ट्रात "मुस्लिम रिश्ते " सांगली हा माझा एकमेव मोफत व्हाट्सअप* ग्रुप आहे. ज्यामध्ये पालकांकडून एक रुपया ही घेतला जातं नाही. फुकट असणारा आणि महिन्याला 2 - 3 स्थळें जमवणारा, स्वतः ऍडमिन असणारा हा "माझाच" ग्रुप आहे, याची "वाचकांनी" नोंद घ्यावी. "गरजवंत पालकांचे " आशीर्वाद असे घ्यायचे असतात . असो.
मुस्लिम रिश्ते या ग्रुप मध्ये बायोडाटा /फोटो "सेंड" करायचा असतो. माझी "खात्री" पटल्यावर आपणास ग्रुप मध्ये ऍड केले जाते .तरुण - तरुणींचे बायोडाटा एकत्र असतात. पालकांच्या "मोबाईल" क्रमांकात कोणतीही खाडाखोड नसते. "पारदर्शी" पणे ग्रुपच्या माध्यमातून विवाह जमतात. केवळ अल्लाह ला "संतुष्ट" करण्यासाठी मी हे "पुण्यकार्य" करत आहे . 8983587160 हा माझा मोबाईल क्रमांक व "व्हाट्सअप नंबर" आहे . ( असंख्य वाचकांच्या "आग्रहास्तव" मोबाईल नंबर लिहीत आहे. )
संकेतस्थळांकडून विवाहासाठी दूरध्वनी !
सांगली - कोल्हापूर तसेच संपूर्ण महाराष्ट्रात पैसे घेऊन व्हाट्सअप ग्रुप मध्ये नावं "ऍड" करण्याचे असे प्रकार सुरु आहेत. त्याशिवाय सांगलीत देखील 3 महिन्याचे 1500 भरा आम्ही स्थळ सूचवू असे अनेक दूरध्वनी जनतेला येत आहेत. सहा महिन्यास 6000 ची "स्कीम" देखील त्यांचेकडे उपलब्ध असल्याचे ते सांगतात. या योजनेत एक "व्यक्ती" आपणास दिला जातो. तो विवाह जमण्यासाठी मदत करतो ,असे त्या संकेत स्थळा कडून सांगण्यात येते.
भारतात काही विवाहाचे संकेतस्थळ प्रामाणिकपणे विवाह जमवतात. त्यांचे विशेष "अभिनंदन" ! परंतु खोटे आश्वासन आणि फसवणूक करून पालकांना हेलपाटे मारायला लावणाऱ्या आणि "व्हाईट कॉलर" असणाऱ्या परंतु बोगस मॅरेज ब्युरो आणि एजंटांना बहुदा आता चाप बसेल ही "आशा" आहे. केरळच्या निकालाने एक "धडा" सर्वांना मिळाला आहे .
.*इकबाल बाबासाहेब मुल्ला*
( *पत्रकार*)
संपादक - सांगली वेध
संपादक - वेध मीडिया न्यूज, सांगली.
*मोबाईल - 8983587160*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा