इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
--- मुस्लिम समाजाचा पवित्र बकरी ईद ( ईद-उल-अजहा ) परिसरात सामुहिक नमाज पठण, प्रार्थना, एकोपा, भाईचारा पाळत साजरा करण्यात आला. यावेळी एकमेकांना आलिंगन देत एकमेकांच्या खुशहालीसाठी प्रार्थना करण्यात आली. तर दुष्काळी व पाणी टंचाई परिस्थितीतून सर्वांची सहिसलामत सुटका होऊन पाऊस काळ चांगला व्हावा अशी सामुहिक प्रार्थना करण्यात आली.
पिंपरी बुद्रुक येथे मौलाना तय्यब शेख यांच्या पाठीमागे समाज बांधवांनी नमाज पठण केले. यावेळी मौलाना तय्यब शेख यांनी उपस्थित समाज बांधवाबरोबर दुष्काळ निवारण व पाऊसासाठी सामुहिक प्रार्थना केली. बावडा येथे मौलाना अब्दुल जिब्राईल रिजवी यांनी समाज बांधवांना नमाज पठण केले. यावेळी परीसरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लुमेवाडी येथील मदिना मस्जिद येथे मौलाना तय्यब शेख यांनी नमाज पठण केले. तर ईदगाह मैदानावर हाफीजो कारी असगरअली यांनी नमाज पठण करून उपस्थित समाज बांधवांना नमाज व कुराणचे महत्व विषद केले. तसेच हाजी हाफीज फत्तेह मोहंमद जोधपूरी बाबा यांच्या दर्गाहमध्ये समाज बांधवांनी सामुहिक प्रार्थना केली. देश व मानव जातीच्या कल्याणासाठी व उत्कर्षासाठी शांतता राखत काम करण्याचे आवाहन करण्यात आले. तर दुष्काळाच्या दाहकता व पाणी टंचाईतून सुटका व्हावी अशी प्रार्थना करण्यात आली.
फोटो - पिंपरी बुद्रुक येथील ईदगाह मैदानावर मौलाना तय्यब शेख यांनी मुस्लिम बांधवांना नमाज पठण व प्रार्थना केली.
------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा