Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १८ जून, २०२४

*लोकसभा निवडणूक संपली--- तयारी विधानसभेची-- महाविकास आघाडी मध्ये जागावाटप जवळपास निश्चित?*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

*मुंबई - 18 जून :* भारताच्या सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्रात सत्ताधारी महायुतीची जोरदार पिछेहाट झाली. दुसऱ्या बाजूला विरोधात असलेल्या महाविकासआघाडीला दणदणीत यश मिळाले. खास करुन पक्षफुटीनंतर मोठे आव्हान उभा ठाकलेल्या उद्धव ठाकरे, शरद पवार यांना निर्विवाद यश मिळाले तर, एकही खासदार नसलेल्या काँग्रेसला या निवडणुकीत पुनरुज्जीवन प्राप्त झाले. दरम्यान, लोकसभा निवडणूक झाल्यावर महाविकासआघाडीला आता विधानसभा निवडणूक 2024 चे वेध लागले आहेत. त्यावरुन जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा सुरु झाल्या आहेत. कोणी किती जागा लढवाव्यात यावर दावे प्रतिदावेही सुरु आहेत.



महाविकासआघाडीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. सांगितले जात आहे की, मविआतील प्रमुख घटक पक्ष असलेले शिवसेना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस (SS) आणि राष्ट्रीय काँग्रेस आपापले प्रभावक्षेत्र आणि निवडून येण्याची क्षमता या बाबी विचारात घेऊन निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे कोकण आणि मुंबईत उद्धव ठाकरे, पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार तर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये काँग्रेस पक्ष अधिक जागा लढवेल. शिवाय, मित्रपपक्षांनाही काही जागा सोडल्या जातील अशी चर्चा आहे.

विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी जागावाटपांच्या मुद्द्यावर प्राथमिक बैठका पार पडत असल्या आणि कोणतीही अधिकृत माहिती बाहेर येत नसली तरी तिन्ही पक्षांकडून जोरदार दावे केले जात आहेत. यामध्ये काँग्रेस 100 ते 105, उद्धव ठाकरे यांची शिवसेना 90-95 तर काँग्रेस 80 ते 85 जागा लढविण्याची तयारी करत असल्याचे समजते. त्यामुळे तिन्ही पक्षांचे नेते वेगवेगळे दावे प्रतिदावे करताना पाहायला मिळत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा