*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
-महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला प्राथमिक शाळा यशवंतनगर ता. माळशिरस येथे दिनांक १५ जुन २०२४ रोजी नवागतांचे स्वागत आणि मोफत पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशाला समिती सदस्य नवनाथ पांढरे तर प्रमुख अतिथी सदस्या जया गायकवाड,मुख्याध्यापक शिवाजी पारसे, सोनाली पाटील,रेळेकर वहिनी ,योगेश गायकवाड उपस्थित होते.
नवीन प्रवेश घेतलेल्या मुलांचे औक्षण करून त्यांना चॉकलेट आणि गुलाब पुष्प देऊन हलगीच्या गजरात सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. काकासाहेब आणि अक्कासाहेब , सावित्रीबाई फुले, थोर शास्त्रज्ञ आर्किमिडीज यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांनी केले. प्रशालेत नवीन प्रवेश घेतलेल्या मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे,सर्व शिक्षकांचे स्वागत करुन या शैक्षणिक वर्षासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक शिवाजी पारसे यांनी शुभेच्छा दिल्या.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुलांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
मध्यान्ह भोजनात मुलांना गोड शिरा आणि मसालेभात यांचे वाटप करण्यात आले.यानिमित्त सर्व शिक्षकांनी फ़ुगे, रांगोळी, फुले यांनी प्रशालेत केलेली सजावट पाहून या प्रवेशोत्सवात सहभागी झालेली मुले, पालक उत्साही आणि आनंदी दिसत होती
प्रवेशोत्सव हा कार्यक्रम प्रशालेच्या सभापती स्वरूपाराणी मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार पार पडला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महादेव राजगुरू, दत्तात्रय लिके, रमेश भोसले, यशवंत दुधाट, शकील मुलाणी, रमेश गायकवाड,ईलाही बागवान, आकाश कदम,स्वप्नील साळुंखे,देवानंद साळवे,रेखा देसाई,सुषमा काशीद,संगिता गोडसे ,शहीनाबी शेख, सुनीता मोटे, हेमा भाकरे कांता साठे, प्रफुल्लता ढालपे, गणिता सर्वगोड, शुभांगी दीक्षित, ललिता शेंडगे यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा